चांदुर रेल्वे तालुक्यातील सावंगा विठोबा येथील इयत्ता १ ते ९वी व ११वी विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण सोहळा
MB-NEWS (चांदुर रेल्वे ):-चांदुर रेल्वे तालुक्यातील सावंगा विठोबा येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा, सावंगा विठोबा येथे श्री छत्रपती शाहू महाराज पुण्यतिथी निमित्त इयत्ता १ ते ७ वी चे विद्यार्थ्यांचा वार्षिक निकाल व इयत्ता ७ वीचे विद्यार्थ्यांना निरोप समारंभ कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिवाकर पाटील , सदस्य विजय रामटेके, गजानन भुताडे, प्रमुख अतिथी सेवानिवृत्त शिक्षक तथा श्री विठोबा संस्थानचे विश्वस्त पुंजाराम नेमाडे, मुख्याध्यापक सुनील गौरखेडे, सहायक अध्यापक बनसोड सर, गोविंद हिरूळकर सर आणि विद्यार्थी यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला.
सावंगा विठोबा येथील इयत्ता १ ते ९वी व ११वीचे सर्वाधिक गुणप्राप्त विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांना पुंजाराम नेमाडे यांनी रोख रक्कम देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने शाळा स्तरावर विविध उपक्रम राबवून स्पर्धेच्या युगात टिकण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांनी अधिकाधिक अभ्यास करणे नितांत गरजेचे आहे. जिद्द, चिकाटी व मेहनत या तीन गोष्टीतून आपल्याला यश संपादन करता येते. भावी उज्वल भविष्या करिता सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा बद्दल प्रमुख अतिथी पुंजाराम नेमाडे यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक सुनील गौरखेडे, आभार प्रदर्शन बनसोड सर यांनी केले.

