खरीप पूर्व नियोजन पर उपसभापती रोशनी पूनसे यांनी घेतली तालुका कृषी अधिकाऱ्यांची भेट.

खरीप पूर्व नियोजन पर उपसभापती रोशनी पूनसे यांनी घेतली तालुका कृषी अधिकाऱ्यांची भेट.

कुठल्याही कंपनीच्या गुणवंत्तापूर्ण बियाण्याचा नावाखाली भेसळयुक्त बियाणे शेतकऱ्यांचा माथी नको – रोशनी पूनसे

MB-NEWS (तिवसा)सुनिल घोरमाडे :-तालुक्यात सद्या खरीपपूर्व तयारी सुरू असून अवघ्या काही दिवसावरच पावसाळा येऊन ठेपला आहे.त्याच धर्तीवर आज उपसभापती रोशनी पूनसे यांनी तालुका कृषी अधिकारी यांची भेट घेत खरीप हंगाम सन २०२३-२४ मध्ये बियाण्याचा बाबतीत शेतकऱ्यांना गुणवंत्ता असलेले कुठल्याही कंपनीचे सर्व प्रकारचे बिबियाणे तसेच रसायनी खते निवीष्ठा धारक दुकानदारा कडे आलेल्या बियाण्यांचे व रासायनिक खतांचे कंपनी निहाय तपासणी करून प्रयोग शाळेत पाठवण्या बाबद कृषी अधिकारी यांच्याशी सकारात्मक चर्चा करण्यात आली.जेणे करून भेसळयुक्त बियाण्या मुळे शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन या वेळी उपसभापती यांनी कृषी विभागास केले. मागील वर्षी सन २०२२-२३ मध्ये बऱ्याच कंपन्याचे बियाणे हे गुणवंत्तापूर्ण नसल्याने तालुक्यातील बऱ्याच शेतकऱ्यांना दुबार पेरणीला सामोरे जावे लागले होते.त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी यांच्या कडे धावघेत बियाणे उगवल्याच नसल्याच्या तक्रारी दाखल केल्या होत्या.त्यामुळे कृषीविभागाच्या मध्यस्थीने बियाणे कंपन्या कडून काही शेतकऱ्यांना बियाने स्वरूपात परतावा देण्यात आला होता.तर बरेचशे शेतकरी या पासून वंचित राहल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान सहन करावे लागले होते.त्याच पार्श्वभूमीवर आज तिवसा पंचायत समितीच्या उपसभापती सौ.रोशनी मुकुंद पूनसे यांनी कृषी विभागाची भेट घेत सन २०२३-२४ च्या येत्या हंगामात कुठल्याही कंपनीच्या गुणवंत्तापूर्ण बियाण्याच्या नावाखाली भेसळयुक्त बियाने तसेच रासायनिक खते शेतकऱ्यांच्या माथी मारता कामा नये असा दम वजा इशारा उपसभापती रोशनी पूनसे यांनी कृषीविभागस दिला.*
*या वेळी तालुका कृषी अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या काही दिवसातच तालुक्यामध्ये खरीप हंगामपूर्व बैठक विभागाचा आमदार श्रीमती यशोमती ठाकूर यांच्या अध्यक्षते खाली घेण्यात येणार असल्याचे तालुका कृषी अधिकारी यांनी सांगितले असून यामध्ये तालुक्यातील सर्व जी.प.सदस्य पं.स.सदस्य सर्व सरपंच / उपसरपंच तसेच विविध कंपन्याचे प्रतिनिधी सर्व निविष्ठा विक्रेते दुकानदार तसेच विविध लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याची माहिती दिली असून या सर्वांच्या सक्षम खरीपपूर्व नियोजन करणार असल्याचे कृषी अधिकारी यांनी सांगितले.*
*यावेळी उपसभापती रोशनी मुकुंद पूनसे यांनी वरखेड महसूल मंडळ मधील वेदरस्टेशन संदर्भात देखील आढावा घेतला असून सदर वेदरस्टेशन मध्ये बऱ्याच दिवसा पासून असलेली तांत्रिक अडचण लवकरात लवकर दूर करून सेवा पूर्ववत करण्याच्या सूचना कृषी विभागास दिल्या.जेणेकरून सदर वेदरस्टेशन मध्ये योग्य प्रकारे पावसाची नोंद होऊन शेतकऱ्यांचे कसल्याही प्रकारचे नुकसान येत्या हंगामात होणार नाही याची दक्षता घेण्याचे आव्हान उपसभापती यांनी कृषी विभागास केले.

शेतकऱ्यांनी खरीप हंगाम २०२३-२४ मध्ये कुठल्याही कंपनीचे बिबियाने,खते खरेदी करते वेळी ते गुणवंत्तापूर्व असल्याची खात्री करूनच घ्यावे.तसेच पेरणी करण्यापूर्वीच बियाणे भेसळयुक्त असल्याचे निदर्शनास आल्यास त्वरित तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा…..

सौ.रोशनी मुकुंद पूनसे उपसभापती पंचायत समिती तिवसा.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे