ते १६ आमदार कोणते ? काय झाले होते त्यावेळेस – जाणून घ्या सविस्तर
▪️ जून २०२२मध्ये शिवसेनेत फूट पडली. एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांना सोबत घेऊन उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर अविश्वास दाखवला.
▪️ त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासह १६आमदार गायब झाले. विधिमंडळ पक्षनेत्याच्या बैठकीलाही हे आमदार उपस्थित राहिले नाही.
▪️मुख्य प्रतोद ची नियुक्ती* – यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पार्टीचा *मुख्य प्रतोद* नियुक्त केला. त्याने तत्कालीन विधानसभा उपाध्यक्षांद्वारा बंडखोर आमदारांना नोटीस पाठवली. तसेच त्यांच्या विरोधात अपात्रतेची कारवाई सुरू केली. – नंतर या १६ आमदारानी न्यायालयात धाव घेतली होती
▪️हे आहेत ते १6 आमदार ?* 1) एकनाथ शिंदे २) अब्दुल सत्तार ३) संदीपान भुमरे ४) संजय शिरसाट ५) तानाजी सावंत ६) यामिनी जाधव ७) चिमणराव पाटील ८) भरत गोगावले ९) लता सोनावणे १०) प्रकाश सुर्वे ११) बालाजी किणीकर १२) अनिल बाबर १३) महेश शिंदे १४) संजय रायमुलकर १५) रमेश बोरणारे१६) बालाजी कल्याणकर

