नांदगांव खंडेश्वर तालुक्यात वाळू तस्करांचा धुमाकूळ,बेंबळा नदी वाळू तस्करांची धनलक्ष्मी…अवैध धंद्यांना आशिर्वाद कुणाचा..?

नांदगांव खंडेश्वर तालुक्यात वाळू तस्करांचा धुमाकूळ,बेंबळा नदी वाळू तस्करांची धनलक्ष्मी…अवैध धंद्यांना आशिर्वाद कुणाचा..?

 

MB-NEWS:-पवन ठाकरे(नांदगाव खंडेश्वर) :-सरकार मागील त्याला वाळू या योजनेअंतर्गत गोरगरीब लोकांपर्यंत अत्यंत कमी दरात वाळू उपलब्ध करण्याची मोहीम राबवायला सुरवात केली आहे. मात्र नांदगांव खंडेश्वर तालुक्यातील नांदसावंगी, जावरा मोळवन, पहूर, शिवनी रसूलापूर, फुबगांव, शेलू नटवा, धानोरा शिक्रा या गावालगत असलेल्या बेंबळा नदीच्या पत्रातून स्थानिक लोकांच्या वतीने ट्रैक्टर च्या माध्यमातून मोठ्याप्रमाणात वाळूचा अवैध प्रकारे उपसा करून वाहतुक केल्या जात आहेत. महसूल प्रशासनाचे तलाठी प्रत्येक गावांत रुजू असून सुध्दा गौण खनिज संपत्तीची तस्करी होतेच कशी काय असा सवाल उपस्थित केला जात आहे. एकीकडे शासन नव नवीन योजना आखून गोर गरीब जनते पर्यंत पोहोचविण्यासाठी अथक परिश्रम करीत आहेत तर काही अधिकारी व कर्मचारी यांच्या हलगर्जीपणामुळे तस्करीला ला सुद्धा वेग आला आहे.

ज्यामुळे शासनाच्या तिजोरीला भला मोठा खिंडार पडतांना दिसून येत आहे. होत असलेल्या अवैध वाळू तस्करीला आशीर्वाद मिळतोय कुणाचा हाच एक संपूर्ण तालुक्यात चर्चेचा विषय ठरला आहे. शासनाने लवकरात लवकर वाळू तस्करी करणाऱ्या लोकांचे अवैध धंदे बंद करून त्यांच्यावर कायदेशीर व दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी तालुक्यातील नागरिकांच्या वतीने होत आहे.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे