Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

तिवसा येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 कारची दु -चाकीला जबर धडक, दोन जण गंभीर जखमी…

तिवसा येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 कारची दु -चाकीला जबर धडक, दोन जण गंभीर जखमी…

 

MB-NEWS (तिवसा )सुनिल घोरमाडे :-तिवसा येथील सॉफ्ट कॉर्नर समोर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ओलांडून जात असताना भरधाव येणाऱ्या कार ने दुचाकी ला जबर धडक दिली.या अपघातात दुचाकी वरील दोन जण गंभीर रित्या जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारा साठी अमरावती सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. नागपूर वरन अमरावतीच्या दिशेने जाणाऱ्या एम एच जि. जे.१९३१ क्रमांकच्या स्विफ्ट कारने महामार्ग ओलांडताना एम एच ३२ एफ ७३०४ या क्रमांकच्या दुचाकीला धडक दिली. ही घटना आज दिनांक १२ मे रोजी दुपारी १.३० वाजताच्या दरम्यान घडली आहे. यात दुचाकी स्वार असलेले दोघे जण तिवसा तालुक्यातील तळेगाव ठाकूर येथील रहिवासी आहे. त्यांचे नाव ज्ञानेश्वर आजनकर वय ६० व राजूभाऊ शेंडे वय ५२ जखमीचे नाव आहेत.जखमीना अपघात झाल्यावर त्वरित त्यांना तिवसा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते नंतर जखमीना त्वरित अमरावती रुग्णालय मध्ये उपचारासाठी रेफर केले. घटनेची माहिती मिळताच तिवसा पोलिसांनी धाव घेत पंचनामा केला असून पुढील तपास तिवसा पोलीस स्टेशन करीत आहे.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे