अपंगांच्या जीवनावश्यक मागण्यांसाठी पंचायत समिती धामणगाव रेल्वे येथे अपंगांचे ठिय्या आंदोलन…जिल्हाध्यक्ष मयूर मेश्राम याच्या नेतृत्वात आंदोलन
MB-NEWS (प्रा.अतुल शर्मा)धामणगाव रेल्वे :-अपंगांचा जलदगतीने विकास व्हावा म्हणून शासनाकडून शासन निर्णय निर्गमित केले जातात व वेळोवेळी आदेश दिले जाते. तरी सुद्धा अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे अपंग हा घटक विकासापासून वंचित राहत आहे व त्यांना न्याय मिळत नाही . यासाठी अपंग जनता दल संघटना महाराष्ट्र राज्य जिल्हा अमरावती च्या वतीने अपंग जनता दल जिल्हाअध्यक्ष श्री . मयुर मेश्राम यांच्या नेतृत्वात पंचायत समिती धामणगाव रेल्वे येथे गटविकास अधिकारी यांच्या दालनात ठिय्या आंदोलनाचे आयोजन केले यावेळी गटविकास अधिकारी श्रीमती माया वानखेडे यांच्या सोबत सर्व जीवनावश्यक मागण्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.सर्व मुद्दे शांतपणे एकूण घेत गटविकास अधिकारी यांनी अपंगांचे सर्व विषय हे निकाली काढू आणि जे कर्मचारी अपंगाची दिशाभूल करतात तांच्यावर कार्यवाही केल्या जाईल,असे आश्वासन श्रीमती, वानखडे मॅडम यांनी दिले.

एकही अपंग शासकीय योजने पासून वंचित राहणार नाही असे आश्वासन देऊन त्यांनीं मतिमंद महिलांसोबत जवळीक साधत फोटो काढून घेतले, या वेळी अपंग जनता दल सामाजिक संघटनेचे जिल्हा सचिव राहुल वानखडे,प्रमोद शेबे,कांचन कुकडे, शहर अध्यक्ष शाहरुख खान फैय्याज़ खान, विजय तेडे,अर्चना मोडले, गंगाधर मुलोंडे,पंकज शर्मा,जयश्री पूनसे,मनीषा टाक,वैशाली सरकटे,रमेश हांडे,सुशील मुलवंडे,अनिता मुलवंडे,निकीता डोंगरे,सुभाष राऊत,सतीश पूनसे,बेबी डोंगरे,गजानन गिरी,बाबर भाऊ,सुलोचना गिरी, प्रवीण पुराम,सुमन कुनबिथोप, भागेश्री कुणबीठोप, शीतल पाटोकार, गोपाल वनवे, सुनील दिगडे,सह 50 अपंग बांधव उपस्थित होते

