महसूल मंत्र्यांची मोठी घोषणा – आता घरकुलासाठी मोफत उपलब्ध होणार वाळू
▪️ राज्य शासनाने नागरिकांना स्वस्त दरात वाळू उपलब्ध होण्यासाठी नवीन वाळू धोरण लागू केले आहे. या नवीन वाळू धोरणाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी नागरिकांचे सहकार्य महत्त्वाचे आहे,असे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे.
▪️ महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, नवीन वाळू धोरणामुळे अवैध वाळू उत्खनन व विक्रीवर नियंत्रण आणण्यासाठी मदत होणार आहे.
▪️ तसेच या धोरणानुसार सामान्य नागरिकांना ६०० रुपये ब्रासप्रमाणे वाळू मिळणार आहे. तर वाळू खरेदी हि ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहे
▪️याचबरोबर घरकुलांसाठी लागणारी ५ ब्रासवाळू नवीन धोरणानुसार उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असेही महसूल मंत्री विखे पाटील यांनी म्हटले आहे.

