Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

जेसीबीच्या धडकेत अजगर जखमी

जेसीबीच्या धडकेत अजगर जखमी

 

MB-NEWS (सुनिल घोरमाडे )गुरुकुंज मोझरी:- येथील दास टेकडीच्या मागे श्री रामकृष्णहरी विठ्ठल मंदिरामागे नालीचे काम सुरु असताना एका दगडाखाली असलेला आठ फुटांचा अजगर जखमी झाला या घटनेची त्वरित माहिती जेसीबी मालक सूरज बोराटे यांनी वाईल्ड लाईफ अवेअरनेस रिसर्च अँड रेस्क्यू वेलफेअर सोसायटीचे वन्यजीवप्रेमी सुमित ठाकरे यांना माहिती दिली माहिती मिळताच अजगराला रेस्क्यू केले. दगड आणि जेसीबी चा मार त्याला लागला होता चेहऱ्यावरील भागाला त्याला जखम झाली असल्याने सर्पमित्र सुमित ठाकरे आणि शुभम विघे यांनी वडाळी येथील वनविभागाच्या तात्पुरत्या उपचार केंद्रात त्याला आणले यावेळी वॉर संस्थेचे अभिजित दाणी प्रतीक माहूरे यांनी जखमी अजगराची माहिती राघवेंद्र नादे,अक्षय देशमुख,श्याम देशमुख,संदीप चौधरी ,किशोर डहाके यांना दिली.

 

त्यांनी उपचारासाठी सर्व पशुचिकित्सलयात दाखल केले डॉ.सागर ढोसर यांनी त्याच्यावर उपचार केले त्याच्या डोळ्याच्या बाजूला आणि डोक्यावर जखम झाली होती त्यावर शस्त्रक्रिया केली काही दिवस त्याला वडाळी येथील वनविभागाच्या उपचार केंद्रात ठेवण्यात येणार आहे व उपचार पूर्ण झाल्यानंतर सोडून देण्यात येणार आहे

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे