तिवसा कृषी उत्पन्न बाजारसमितीचे सभापतीपदी रवींद्र राऊत …. उपसभापती जयकांत माहोरे यांची अविरोध निवड

तिवसा कृषी उत्पन्न बाजारसमितीचे सभापतीपदी रवींद्र राऊत…. उपसभापती जयकांत माहोरे यांची अविरोध निवड

 

MB-NEWS सुनिल घोरमाडे (तिवसा):-तिवसा कृषी उत्पन्न बाजारसमितीच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी समर्थित सहकार पॅनलने एकहाती विजय मिळविला होता. शुक्रवार १९ रोजी या बाजारसमितीच्या सभापती व उपसभापती पदासाठी निवडणूक होती; मात्र सभापती व उपसभापती पदासाठी प्रत्येकी एकमेव अर्ज दाखल झाला होता. यामुळे समापतीपदी दापोरी खुर्द येथील रवींद्र राऊत, तर उपसभापती शेंदूरजना माहुरा येथील जयकांत माहोरे यांची अविरोध निवड घोषित करण्यात आली.
तिवसा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये कॉंग्रेस व उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या संयुक्त सहकार पॅनलने बाजार समितीची निवडणूक लढवली होती. यावेळी १८ ही जागा काबीज करीत आ. यशोमती ठाकूर व शिवसेनेचे विलास माहुरे यांनी आपले वर्चस्व सिद्ध केले.

या आघाडीनुसारच काँग्रेसला समापती पद व शिवसेनाला उपसभापती पद मिळण्यात आले आहे. सभापती व उपसभापती पदाची निवड होताच तिवसा सर्किट हाऊसवर नवनिर्वाचित सभापती व उपसभापती यांचा सत्कार करण्यात आला. राधे यांनी कामकाज पाहिले.

यावेळी सहकार नेते तथा अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष सुरेश साबळे, राजू ठाकूर, विलास माहुरे, बँक संचालक संजय मार्डीकर, सतीश पारधी, अभिजित बोके, दिलीप काळबांडे, कमलाकर वाघ, श्रीराम देशमुखसह नवनिर्वाचित कृउबासचे सभापती रवींद्र राऊत, उपसभापती जयकांत माहोरे, विवेक देशमुख, तुळशीराम भोयर, स्वप्नील केने, विनायक तसरे, गजानन वानखडे, अशोक मनोहर, राजेश वेरुळकर, मनोज साबळे, सौ. मेघा गोहत्रे, वंदना पाटेकर, मंगेश राठोड, मोहन चर्जन, कैलास पंपालिया, राजेंद्र मढवे, विशाल सावरकर, जितेंद्र बायस्कर उपस्थित होते.

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून गजानन डावरे, सहायक निबंधक मनोज रोहनकर व बाजारसमिती सचिव ज्योती रोंगे यांनी कामकाज पाहिले

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे