Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

आमदार अॅड. यशोमती ठाकूर यांचे प्रतिपादन.आयुष्यात मिळालेल्या प्रत्येक संधीच सोन करा .

आमदार अॅड. यशोमती ठाकूर यांचे प्रतिपादन.आयुष्यात मिळालेल्या प्रत्येक संधीच सोन करा .

MB-NEWS तिवसा (सुनिल घोरमाडे ) प्रतिनिधी :-आयुष्यात जी संधी मिळते त्या संधीचे सोन करा. हाच जॉब महोत्सवाच्या निमित्याने आम्ही तुम्हाला संधी उपलब्ध करुन दिली, कदाचित तुमच्या आयुष्याला या संधीच्या निमित्याने कलाटणी मिळेल, असे प्रतिपादन राज्याच्या माजी महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री आमदार अँड. यशोमती ठाकूर यांनी केल. त्या आज 21 मे रोजी मोझरी येथे श्री रामचंद्र युवक कल्याण संस्था मोझरी व आमदार यशोमती ठाकूर मित्र मंडळाच्या वतीने आयोजित जाँब महोत्सवात बोलतांना म्हणाल्या.

त्या पुढे बोलतांना म्हणाल्या की, प्रगतीचा मार्ग इतका सहज सोपा नसतो, परंतु आपण त्या मार्गावर जाण्यासाठी मेहमत आणि परिश्रम घेतले पाहिजे. यश अपयश याचा विचार करु नका तुम्हाला जी संधी मिळाली त्याच सोनं करा. आपले आईवडिल आपल्यासाठीच कष्ट करीत असतात, त्यांना नेहमीच वाटत आपल्या मुलांनी मोठ यश मिळवावं पण कधीकधी त्यांच स्वप्न पुर्ण करणे आपल्याला जमत नाही, मात्र नोकरी मिळाली नाही म्हणून निराश होवू नका.
तुम्हाला जो अनुभव मिळाला तो अनुभव भावी आयुष्यात महत्वाचा ठरतो अस सांगून त्या म्हणाल्या की, हा अनुभव तुम्हाला परत एकदा यशासाठी एक नवी दिशा देणारा ठरणार आहे, असही त्या यावेळी म्हणाल्या की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये खुप टॅलेंट आहे, पण त्यांना एक दिशा दाखविणारा कुणीतरी हवा असतो. आज ती भुमिका आम्ही आज वठवतोय. आम्हाला ठाम विश्वास आहे की, या संधिच तुम्ही निश्चितपणे सोनं कराल, असही त्या यावेळी म्हणाल्या,

जॉब महोत्सवाला उत्स्फूर्त

प्रतिसाद – श्री रामचंद्र युवक कल्याण संस्था व आमदार अॅड. यशोमती ठाकूर मित्र मंडळाच्या वतीनेमहोत्सवाला अमरावती, भातकुली, मोर्शी व तिवसा तालुक्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. इयत्ता 10 वी. पासून ते अभियंता व इतर शैक्षणिक पात्रता असलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी या जॉब महोत्सवाला उत्स्फूर्तपणे उपस्थिती दर्शविली.

60 च्यावर कंपन्यांनी घेतली

मुलाखत जॉब महोत्सवात 60 च्यावर विविध कंपन्यानी उपस्थित उमेदवारांच्या ग्रामीण मुलाखती घेतल्या. सकाळी 9:00 वाजता पासूनच अनेक युवक- युवतींची मुलाखती देण्यासाठी एकच लगबग सुरु होती. या जब महोत्सवाच्या निमित्याने प्रथम ग्रामीण भागातील उमेदवारांना

रोजगार आपल्या दारी ही संधी उपलब्ध झाल्यामुळे त्यांच्यात एक प्रचंड उत्साह दिसून येत होता. जॉब महोत्सवापूर्वी मुलाखत कशी द्यायची व त्यासाठी नेमकी काय तयारी करायची है जॉब पूर्व प्रशिक्षणाचा कार्यक्रमही श्रीरामचंद्र युवक कल्याण संस्थेच्या वतीने करण्यात आल्यामुळे याचा फायदा प्रत्यक्ष मुलाखत देतांना या युवकांना निश्चितपणे होणार असून भागातील युवकांना रोजगाराच्या संधीचे दालन या निमित्याने त्यांच्याच गावात उपलब्ध झाल्यामुळे रोजगाराच्या संधीच्या शोधात असलेल्या युवकांना हा रोजगार महोत्सव निश्चितपणे एक मोठा दिलासा देणारा ठरला आहे.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे