Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

12वी बोर्डाचा निकाल आज दुपारी 2 वाजता, ‘असा व येथे’ पाहा तुमचा निकाल..

12वी बोर्डाचा निकाल आज दुपारी 2 वाजता, ‘असा व येथे’ पाहा तुमचा निकाल..

 

 महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीच्या परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर झाली असून बारावीचा निकाल उद्या म्हणजेच 25 मे रोजी लागणार आहे. लाखो विद्यार्थी आणि त्याचे पालकांचं बारावीच्या निकालाकडे लक्ष लागलं होतं.

 बारावीचा निकाल आज *दुपारी 2:00* वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळांवर जाहीर होणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर 26 मे ते 5 जूनपर्यंत विद्यार्थ्यांना गुण पडताळणीसाठी वेबसाईटवर अर्ज करता येईल. तसेच उत्तर पत्रिकेच्या छायाप्रतीसाठी 26 मे ते 14 जून दरम्यान ऑनलाईन अर्ज विद्यार्थ्यांना करता येणार आहे. विद्यार्थ्यांना 5 जून रोजी गुणपत्रिका महाविद्यालयात मिळणार आहे.

 *कुठे व कसा पाहता येईल निकाल?*

▪️ बारावीचे विद्यार्थी व त्यांचे पालक
1) www.mahahsscboard.in
2) mahresult.nic.in
3) hscresult.mkcl.org या संकेतस्थळावर आपले निकाल पाहू शकतात.

▪️यासाठी विद्यार्थ्यांना वरीलपैकी कोणत्याही एका साईटवर बारावीचा पर्याय निवडावा लागेल.
▪️त्यानंतर हॉल तिकीट क्रमांक आणि इतर डिटेल्स भरल्यानंतर तुमचा निकाल तु्म्हाला कळेल.
▪️विद्यार्थी आपला निकाल डाऊनलोड करुन त्याची प्रिंट देखील काढू शकतात.

▪️ *SMS द्वारे असा पाहा निकाल?*
▪️ विद्यार्थ्यांना SMS द्वारेही आपला निकाल पाहता येणार आहे. विद्यार्थ्यांना मेसेज बॉक्समध्ये आपला सीट नंबर टाकून 57766 या क्रमांकावर सेंड करावा लागणार आहे. यानंतर त्याच मोबाईल नंबरवर तुम्हाला तुमचा निकाल पाहता येईल

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे