जिथे दिसशील तिथे मुडदा पाडतो .  तलाठ्याने दिली पत्रकाराला धमकी.

जिथे दिसशील तिथे मुडदा पाडतो .
 तलाठ्याने दिली पत्रकाराला धमकी.

MB-NEWS-तिवसा ता.प्र.(नंदकिशोर मते व सुनील घोरमाडे):-  जातील अनिष्ट रूढी परंपरा, अंधश्रद्धा, अन्याय, अत्याचार व भ्रष्टाचाराला वाचा फोडणा-या लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभाला खिंडार पाडण्याचे काम समाजातील काही अपप्रवृत्तीकडुन सातत्याने सुरू आहे.असाच प्रकार गुरुवारी २५ मे रोजी तिवसा तहसिल आवारात दैनिक लोकमतचे तालुका प्रतिनिधी संदीप राऊत यांचे
सोबत घडला.तालुक्यातील मौजे धामंत्री येथील तलाठी प्रशांत जोशी याने वाळूघाटांविरोधी वृत्त प्रकाशित केल्यामुळे पत्रकार संदीप राऊत यांना अश्लील शिविगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली.
यंदा वाळू घाटांचे लिलाव न झाल्याने सर्वसामान्य नागरिकांना बांधकाम करतांना मोठी अडचण निर्माण होत आहे.अशातच शासनाचे नवीन वाळू धोरणही फसले.त्यामुळे अवैध वाळू वाहतुकीला उधाण आले आहे.याबाबत दैनिक लोकमतने दोन दिवसांपूर्वी संपूर्ण जिल्ह्यात प्रत्यक्ष वाळू घाटांवर जाऊन स्टिंग ऑपरेशन राबविले.यामुळे प्रशासनही सजग झाले.परंतु अशा आशयाची बातमी का प्रकाशित केली म्हणून चवताळलेल्या तलाठ्याने सर्वांसमक्ष पत्रकाराला अश्लील शिव्यांची लाखोली वाहिली.
अवैध वाळू वाहतुकीला चालना देणा-या व वाळू तस्करांशी अर्थपूर्ण संबंध असलेल्या तलाठ्यावर पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात यावी.व भ्रष्ट तलाठ्याला सेवेतून बडतर्फ करण्यात यावे अशी मागणी करत तिवसा तालुका मराठी पत्रकार संघटनेच्या वतीने पोलिस स्टेशन तिवसा येथे तक्रार दाखल करण्यात आली असून तहसिलदारांना निवेदन देण्यात आले आहे.
यावेळी पत्रकार संघटनेचे तालुकाध्यक्ष हेमंत निखाडे,प्रशिक मकेश्वर, संदीप राऊत, जयंत निखाडे,नंदु मते, अंकुश बोके उपस्थित होते.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे