Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

आरोग्य मित्रांतर्फे पगार वाढीसाठी जिल्हा प्रमुखांना निवेदन..11 वर्षांपासून तुटपुंज्या मानधनावर देताहेत सेवा

आरोग्य मित्रांतर्फे पगार वाढीसाठी जिल्हा प्रमुखांना निवेदन..11 वर्षांपासून तुटपुंज्या मानधनावर देताहेत सेवा

MB-NEWS अमरावती( रवि कलाने) :– महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या मासिक मिटिंग मध्ये नवनियुक्त क्लस्टर हेड (अमरावती,अकोला,वाशीम) गजानन पांडे यांचे आरोग्यमित्र अमरावती जिल्हा यांच्या वतीने स्वागत करून जिल्हा प्रमुख डॉ. कांचन भिसे व क्लस्टर हेड गजानन पांडे यांना आरोग्यमित्र अमरावती जिल्हा यांचे कडून पगार वाढीबाबत निवेदन देण्यात आले
अमरावती जिल्ह्यातील आरोग्यमित्र हे योजनेच्या सुरवाती पासून म्हणजेच २०१२ ला केवळ 6000 इतक्या मासिक पगारात काम केले. परंतु आता वाढती महागाई लक्षात घेता केवळ 11465/- रुपये इतकीच वाढ झाली या तुटपुंज्या मानधनावर कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे शक्य नसल्याने कुटुंबाची वाताहत होत आहे हि बाब वरिष्ठांच्या लक्षात या निवेदनाद्वारे आणून देण्यात आली, ईतर वरिष्ठ कर्मचाऱ्यांचे पगार मात्र आरोग्य मित्रांपेक्षा वाढलेत परंतु अकरा वर्षांपासून
प्रामाणिकपणे सेवा देणाऱ्या आरोग्य मित्रांच्या पगारात मात्र हवी तितकी वाढ झाली नाही सामान्य नागरिकांना आरोग्य विषयक शासनाच्या विविध योजनेचा लाभ त्यांच्या माध्यमातून मिळतोय निराधार रुग्णाचा आधार म्हणून आरोग्य मित्र सतत कार्यरत असतात त्यामुळे किमान मासिक वेतन 25000 करण्यात यावे या मागणीसह इतर मागणीचे निवेदन आरोग्य मित्रांद्वारे देण्यात आले यावेळी आरोग्य मित्र स्वप्नील ठाकरे,मंगेश पुनसे,निलेश वानखडे,आशिष बनसोड, दिपक डोईफोडे,मंगेश वडतकर,अमरदीप तायडे, किशोर बद्रे,कीर्ती ठाकूर, राहुल काकडे,ज्योती आठवले,सारिका चौधरी, भूषण बेलसरे, सुधीर अलोने, नितेश कोथळे आदि उपस्थित होते

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे