अमरावती येथील माता खिडकी परिसरातील द्वारकाधीश श्रीकृष्ण मंदिरात श्रीकृष्ण मंदिर देवस्थानच्या वतीने ब्रह्मविद्या शास्त्रांतर्गत अनुसरणाचे साध्य या विषयावर निरूपण सोहळ्याचे आयोजन
MB-NEWS(अमरावती) :-अमरावती येथील माता खिडकी परिसरातील द्वारकाधीश श्रीकृष्ण मंदिरात श्रीकृष्ण मंदिर देवस्थानच्या वतीने ब्रह्मविद्या शास्त्रांतर्गत *अनुसरणाचे साध्य* या विषयावर निरूपण सोहळ्याचे आयोजन शनिवार दिनांक १०जुन ते रविवार दिनांक १८ जुन पर्यंत करण्यात आले आहे
या सोहळ्या अंतर्गत दररोज सायंकाळी ७ ते ८-३० या वेळेत उल्हासनगर मुंबई येथील प.पु ई. श्री. सागर दादा तळेगावकर महानुभाव यांचे ब्रह्मविद्या शास्त्रांतर्गत अनुसरणचे साध्य या विषयावर प्रवचन आयोजीत करण्यात आले आहे. त्यांची अनेक ठिकाणी सतत प्रवचने होत असतात
ई.श्री. सागर दादा यांचा ब्रह्मविद्या शास्त्राचा गाढा अभ्यास आहे मुंबई पुणे अकोला अमरावती येथे त्यांची दररोज सतत प्रवचने सुरू असतात तसेच त्यांचे सर्वच प्रवचनाची रेकाँर्डीग युटुब च्या माध्यमातुन प्रकाशीत झाले असुन भाविक भक्त मोठ्या श्रद्धेने नियमित ऐकतात लीळाचरीत्र तसेच सुत्रपाठातील पुजाअवसर, श्री चक्रधर स्वामींची सूत्रे, महानुभावांचा आचार, स्वामींनी सांगितलेले दृष्टांत इत्यादी विषयावर ते सतत मार्गदर्शन करतात उल्हासनगर येथील श्रीकृष्ण मंदिराचे संचालक असून संकल्प आध्यात्मिक परिवार या संस्थेचे ते संस्थापक आहेत अत्यंत साध्या व सोप्या पद्धतीने प्रवचनाद्वारे प्रबोधन हेच त्यांच्या प्रवचनाची वैशिष्ट्ये आहेत
प्रवचन सोहळ्याचे उद्घाटन शनीवार दिनांक १० जून रोजी संध्याकाळी ७ वाजता संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील महानुभाव अध्यासनाचे प्रमुख पु.महंत डाँ श्री सोनपेठकर बाबा महानुभाव यांचा हस्ते ऊद्घाटन करण्यात येईल या निरूपण सोहळ्याचा समारोपीय कार्यक्रम रविवार दिनांक १८ जून रोजी सकाळी १० वाजता कविश्वर कुलाचार्य प.पु.प.म. कारंजेकर बाबा , प.पु. महंत डाँ सोनपेठकर बाबा तसेच प.पु.महंत वैद्यराज बाबा महानुभाव यांचा ऊपस्थीतीत संपन्न होईल तरी या संपुर्ण कार्यक्रमाचा भाविक भक्तांनी घ्यावा असे आवाहन श्रीकृष्ण मंदिर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सुभाष पावडे उपाध्यक्ष डाँ.अशोकराव राऊत सचिव अँड. अरूण ठाकरे कोषाध्यक्ष ईंजी. एस पी देशमुख विश्वस्त अनिल साहनी, सुशांत चर्जन,रावसाहेब राऊत तर्फे करण्यात आले आहे.

