तिवसा येथे १० वी व १२ वी च्या परीक्षेत प्राविण्य प्राप्त* गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न

तिवसा येथे १० वी व १२ वी च्या परीक्षेत प्राविण्य प्राप्त* गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न

 

MB-NEWS (तिवसा) सुनील घोरमाडे :-एन एस यु आय तिवसा व आमदार यशोमतीताई ठाकूर मित्र मंडळ यांच्या वतीने आयोजित तिवसा येथील गुणवंत विद्यार्थी यांचा सत्कार व सन्मान सोहळा गुरुकुल कोचिंग क्लासेसच्या जिओ हॉल येथे संपन्न झाला.* *तिवसा शहरातील व तालुक्यातील एस एस सी व एच एस सी परीक्षेत प्रावीण्य प्राप्त करणाऱ्या २६ विद्यार्थ्यांचा सत्कार महाराष्ट्र प्रदेश एन एस यु आय सचिव कु.आकांक्षा सोनवणे ( ठाकूर ), माजी जि प सभापती दिलीपराव काळबांडे, नगराध्यक्ष योगेश क वानखडे, नगरसेवक वैभव स वानखडे, गटनेते किसनराव मुंदाणे, नगरसेविका सौ अर्चना भोंबे, शहर काँग्रेस अध्यक्ष सेतूभाऊ देशमुख, श्रीराम नागरी पतसंस्था संचालक स्वप्नील गंधे, महिला काँग्रेस अध्यक्ष सौ रुपाली काळे , माजी नगरसेवक नरेंद्र विघ्ने यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.* *सामान्य शेतकरी कुटुंबातील विद्यार्थी व विद्यार्थीनी यांनी आपल्या पालकांचे स्वप्न आणि तिवसा शहराचे नावलौकिक प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांनी केले त्यांचा यथोचित सन्मान होणे हे आपले सामाजिक कर्तव्य आहे त्यांच्या ईच्छा आकांक्षाना बळ देणे हे सुद्धा आमदार यशोमती ताई ठाकूर मित्र मंडळ चे कामच आहे असे मनोगत यावेळी वैभव वानखडे यांनी व्यक्त केले.* *महाराष्ट्र प्रदेश एन एस यु आय सचिव कु.आकांक्षा सोनवणे (ठाकूर) यांनी यावेळी एन एस यु आय मार्फत १० वी १२ वी प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांना भविष्यातील शैक्षणिक मदत करण्याचा शब्द यावेळी आपल्या शुभेच्छारुपी मनोगतातून दिल्या.* *वर्ग १२ वीतील कु.सानिका सुनिलराव देशमुख, कु समृद्धी लढे, कु साक्षी नांदणे, जयदीप गंधे, रोहित वानखडे, १० वितील कु.शर्वरी श्रीकांत देशमुख, कु धनश्री चौधरी, शुभम गहुकर, पार्थ वानखडे, श्रेया शेळके, कु. श्वेता मोहतुरे, कु ईशिता काळे, कु दिव्या तालन, देवांशु मोहेकर रोहन वर्मा , कु. कांचन आमले, कु.कृष्णाई शा. देशमुख, अथर्व लव्हाळे, सृजल लांडगे, राधिका खडसे,देवश्री इंगळे, ईश्वरी बोंडे,कु ईश्वरी केने, कु सना शहा, अमित मुंदरे, रावसाहेब ठाकूर विद्या निकेतन मोझरीचे श्रुतिका विजय भिवगडे, कु.नेत्राली संजय पाचघरे, कु.गुंजन स घोरमाडे,कु मेहरा राजेश राऊत यांच्यासह पालकांचा सन्मान शाल, पुष्पगुच्छ, भेटवस्तू देऊन करण्यात आला* *यावेळी गुरुकुल कोचिंग क्लासेसचे श्री गणेश गोरे सर,* *श्री आशिष महल्ले सर, सौ कृष्णाताई वानखडे, पंजाबराव मात्रे सर, माजी संचालक श्रीराम नागरी श्री अंकुश देशमुख,* किशोर गौरखेडे, *आशिष खाकसे, सचिन वानखडे , आशिष ताथोडे, एन एस यु आय तालुका अध्यक्ष अनिकेत प्रधान, शहर अध्यक्ष आकाश मकेश्वर, अजय बाखडे विधानसभा सोशल मीडिया अध्यक्ष मोहित मोटघरे, मिलिंद करडे यांनी परिश्रम घेतले.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे