सरकारला ९ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मोदी सेवा सुशासन आणि गरीब कल्याण या विशेष उपक्रमाच्या आयोजन
MB-NEWSअक्षय अथोटे
मेळघाट चिखलदरा प्रतिनिधी
दि.१८ जून धारणी तालुक्यातील दिया गवत मोदी सेवा सुशासन आणि गरीब कल्याण या विशेष उपक्रमाच्या माध्यमातून सरकारला ९ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने जेष्ठ कार्यकर्ता संमेलन व लाभार्थी संमेलन धारणी तालुक्यातील दिया गवत संपन्न झाले.
देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारला ९ वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने दिया गवत जेष्ठ कार्यकर्त्यांचा संमेलन व लाभार्थी संमेलन संपन्न झाले यावेळी संमेलनाला माजी आमदार प्रभूदासजी भिलावेकर तसेच प्रमुख उपस्थिती अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष गोपालजी चंदन होते,यावेळी सोबत माजी आमदार पटल्या गुरुजी,भाजपचे रमेशजी मावस्कर,गोपालजी राठोड,सौ.शमाताई चौकसे,तालुकाध्यक्ष हिरालालजी मावस्कर,सदाशिवराव खडके,सुभाषजी गुप्ता,आप्पा पाटील,सुरेंद्रजी पटेल,मनीषजी पांडे,धोंडीबाजी, मुंडे, नालमवारजी,गणेश येवले, कमलेश जयस्वाल,तुळशीराम बेठेकर, साबुलालजी पाटणकर, दीपांशु जयस्वाल आदी ज्येष्ठ कार्यकर्ता व मोठ्या संख्येने भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते बूथ प्रमुख शक्ती केंद्रप्रमुख उपस्थित होते.

