Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

मातृवियोगाचे दुःख फार मोठे आहे – विरोधी पक्ष नेता ना. अजितदादा पवार

मातृवियोगाचे दुःख फार मोठे आहे – विरोधी पक्ष नेता ना. अजितदादा पवार

शोकाकुल खोडके परिवाराचे निवासस्थानी सांत्वना भेट

अभियंता भवन येथे पुण्यनुमोदन कार्यक्रमात मातोश्रीना वाहिली श्रद्धांजली

MB-NEWS(अमरावती) :- महाराष्ट्र विधानसभेचेने विरोधी पक्ष नेता तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जेष्ठ नेते ना.अजितदादा पवार यांनी आज सोमवार,दिनांक १९ जून २०२३ रोजी अमरावती येथे येऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष संजय खोडके यांच्या गाडगे नगर स्थित निवासस्थानी भेट दिली.
गेल्या ६ जून २०२३ रोजी संजय खोडके यांच्या मातोश्री श्रीमती सुशीलाबाई विनायकराव खोडके यांचे वयाच्या ९१ व्या वर्षी दुःखद निधन झाले होते. अभियंता भवन येथे आज त्यांच्या पुण्यनुमोदन कार्यक्रम प्रसंगी अजितदादांनी आवर्जून हजेरी लावून स्मृतीशेष मातोश्री श्रीमती सुशीलाबाई विनायकराव खोडके यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. तसेच शोकाकुल खोडके परीवारातील सदस्यांची भेट घेऊन सांत्वन सुद्धा केले. दरम्यान ना.अजितदादा पवार यांनी अमरावतीच्या आ.सौं. सुलभाताई खोडके, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष संजय खोडके, प्रशांत खोडके ,यश खोडके यांचे सोबत संवाद साधून सांत्वन केले.
मातृवियोगाचे दुःख निश्चितच मोठे असून या दुःखातून सावरण्याचे बळ खोडके कुटुंबियांना मिळो. दुःखद प्रसंगात आपण व पवार कुटुंबीय सोबत आहेत . मातोश्रींच्या आत्म्यास सद्गती लाभो,अशी प्रार्थना करीत आहोत,अशी शोक संवेदना राज्याचे विरोधी पक्ष नेता अजितदादा पवार यांनी पुण्यनुमोदन प्रसंगी व्यक्त केली.अभियंता भवन येथील पुण्यानुमोदन कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवर , आप्तस्वकीय नातेवाईक तसेच कार्यकर्ते सहभागी झाले होते .

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे