Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

विकास आराखड्यातील कामाना मिळणार वाढीव निधी आयुक्त कार्यालयात पार पडली आढावा बैठक

विकास आराखड्यातील कामाना मिळणार वाढीव निधी आयुक्त कार्यालयात पार पडली आढावा बैठक

MB-NEWS(सुनिल घोरमाडे):-मोझरी, वलगाव व कौडण्यपूर. येथील विकास आराखड्यातील. विकासकामासाठी वाढीव निधी मिळणार असल्याची माहिती आज 23 जून रोजी विभागीय आयुक्त कार्यलयात आयोजित आढावा बैठकीत आमदार यशोमती ठाकूर यांनी दिली.यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की वाढीव निधी मिळणार आहे पण येथील इमारतीच्या हस्तातरणाची प्रक्रिया जलदगतीने पूर्ण व्हावी हा महत्वाचा मुद्दा असून तो निकाली निकाली निघावा अशी मागणी करण्यासोबतच,कोविड काळात काही कामे रखडली होती ती जलदगतीने पूर्ण करण्यात यावी अशी सूचना सुद्धा त्यांनी या बैठकीत केली.

त्या पुढे म्हणाल्या की विकास आराखड्यातील जी कामे निधी अभावी अपूर्ण आहेत त्या कामासाठी मिळणारा वाढीव निधी आणि येथील इमारत हस्तातरण प्रक्रिया
जलदगतीने पूर्ण व्हावी या दोन मुद्याचा आढावा घेण्याच्या दृष्टीने हीं बैठक घेण्यात आल्याचे त्या बोलताना म्हणाल्या.
पत्र दिल्यामुळे आढावा बैठक
मोझरी,वलगाव व कौडण्यपूर येथील काही विकास कामे आणि फर्निचरची कामे निधी अभावी अपूर्ण आहेत. या कामासाठी आणि मोझरी येथील विकास कामासाठी 100कोटी अतिरिक्त निधी मिळावा यासाठी आपण नुकतेच पालकमंत्र्यांना पत्र दिले त्या पत्राच्या अनुषंगाने हीं आढावा बैठक घेण्यात आली आहे अशीहीं माहिती त्यांनी दिली.
कोविड काळातील रखडलेली कामे पूर्ण व्हावी
कोविड संकट काळात येथील विकास कामे रखडलेली होती. ती कामे जलद गतीने पूर्ण करण्यात यावी अशी मागणी आमदार यशोमती ठाकुर या वेळी केली.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे