Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

उद्या आषाढी एकादशीनिमित्य घुईखेडात दर्शानासाठी येणार लाखो भाविक….घुईखेडमध्ये अवतरणार प्रति पंढरपुर

उद्या आषाढी एकादशीनिमित्य घुईखेडात दर्शानासाठी येणार लाखो भाविक….घुईखेडमध्ये अवतरणार प्रति पंढरपुर

MB-NEWSचांदुर रेल्वे :-विदर्भ प्रांतातील एकमेव असलेली श्री. संत बेंडोजी महाराज संजीवण समाधी, श्री क्षेत्र घुईखेड येथे आज गुरूवारी आषाढी एकादशीनिमित्य लाखो भाविक दर्शनासाठी गर्दी करणार असुन घुईखेडमध्ये प्रति पंढरपूर अवतरल्याचे चित्र पहावयास मिळणार आहे.

आषाढी एकादशी ही एका प्रकारची तालुक्यातील भावीक भक्तांकरीता अलौकीकच ठरत आहे. घुईखेड येथे आज बेंडोजी महाराजांची मिरवणुक काढण्यात येणार असुन दर्शनासाठी हजारो भाविकभक्त येणार आहे. हा क्षण पाहण्यासाठी व दैवतांचे दर्शन घेण्यासाठी गावातील प्रथेनुसार विशेषत: नवविवाहीत मुली तसेच बाहेरगावी कामानिमित्य राहणारे घुईखेडवासी या दिवशी गावात परत येतात. श्री. संत बेंडोजी महाराजांची पालखी एकादशीच्या दिवशी सायंकाळी ५ वाजता मंदिराच्या बाहेर प्रवेश करून नागपुर- औरंगाबाद एक्सप्रेस हायवेवरून जाऊन चंद्रभागा नदीच्या पात्रामध्ये परंपरेनुसार आरती करण्यात येणार आहे. यानंतर मंदिरात आरती होऊन सोहळ्याची समाप्ती सायंकाळी होणार आहे. त्यामुळे या मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी भाविक भक्तांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थानचे अध्यक्ष वसंतराव घुईखेडकर, विश्वस्त प्रविण घुईखेडकर व इतरांनी केले आहे.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे