गुरुकुंज मोझरीजवळ आयशर ट्रकचा अपघात.*
-समोरील ट्रकवर धडकला मागील ट्रक.
-एक जण जखमी.
MB-NEWS(तिवसा) ता.प्र.नंदकिशोर मते:
दि.२९ जुन ला गुरुकुंज मोझरी नजक राष्ट्रीय महामार्गावर – नागपूरकडे जाणाऱ्या आयशर ट्रक समोरील एका अज्ञात ट्रकवर धडकून झालेल्या अपघातात आयशर ट्रकचालक हा गंभीररीत्या जखमी झाला आहे. आज २९ जून रोजी दुपारी ४ वाजताचे सुमारास ही घटना गुरुकुंज मोझरी येथील साईकृपा हॉटेल समोर घडली.
ट्रक क्रमांक एम एच ०४ -जी आर- २९५८ हा आयशर ट्रक अमरावती वरून नागपूरकडे जात होता.दरम्यान गुरुकुंज मोझरी जवळील पाटील यांच्या साईकृपा हॉटेल समोर अचानक मागील ट्रक हा समोरील एका अज्ञात ट्रकवर जाऊन धडकला.ही धडक एवढी भीषण होती की,अक्षरशः अपघातात मागून धडकलेल्या आयशर ट्रकचालकाचे दोन्ही पाय कॅबिनमध्ये अडकून बसले होते.तेव्हा अपघात होताच तेथील हॉटेल मालक विश्वनाथ पाटील व गजानन ठाकरे,अरुण गोसावी आदींनी ट्रककडे धाव घेत अपघातग्रस्त ट्रकच्या कबिनमध्ये फसलेल्या चालकाला बाहेर काढले.जखमी ट्रकचालकाचे नाव उशिरापर्यंत कळू शकले नाही.अपघातानंतर समोरील ट्रक पळून गेला तर आयशर ट्रक घटनास्थळी होता.अपघातात चालकाचा पाय निकामी झाला असून त्यास तातडीने थेट रुग्णवाहिकेच्या मदतीने उपचारार्थ अमरावती येथे पुढील दाखल करण्यात आले. तिवसा पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून पुढील तपास सुरू आहे.

