ए.एस. न्यूज महाराष्ट्रच्या कार्यालयाचे चांदूर रेल्वेत थाटात उद्घाटन.युसुफ खान व डॉ. क्रांतीसागर ढोले यांच्या हस्ते उद्घाटन खासदार रामदास तडस व आमदार प्रताप अडसड यांची भेट
MB-NEWS चांदूर रेल्वे – (मंगेश बोबडे):-ए.एस. न्यूज महाराष्ट्रच्या कार्यालयाचे चांदूर रेल्वे शहरात जिल्हा परिषद शाळेसमोर थाटात उद्घाटन अखिल भारतीय ग्रामिण पत्रकार संघाचे केंद्रीय कार्याध्यक्ष युसुफ खान व सक्षम बहुउद्देशीय संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. क्रांतिसागर ढोले यांच्याहस्ते रविवारी पार पडले. तर खासदार रामदास तडस व आमदार प्रताप अडसड यांनी कार्यालयाला भेट दिली.
ए.एस. न्यूज महाराष्ट्र, सक्षम बहुउद्देशीय संस्था व राज डिजिटल या सर्वांचं ऑफिस एकाच ठिकाणी नवीन जोशाने व नवीन अत्याधुनिक साहित्य घेऊन ए.एस न्युज महाराष्ट्रचे सहसंपादक राजीव शिवणकर यांनी सुरू केले आहे. ए.एस न्युजचे संपादक अनिल साखरकर यांच्या सहकार्याने व मार्गदर्शनात सदर कार्यालय तयार करण्यात आले. यानंतर रविवारी या कार्यालयाचा थाटात उद्घाटन सोहळा पार पडला. उद्घाटनीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय ग्रामिण पत्रकार संघाचे केंद्रीय कार्याध्यक्ष युसुफ खान हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून सक्षम बहुउद्देशीय संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. क्रांतिसागर ढोले, केंद्रीय संपर्क प्रमुख प्रा. रवींद्र मेंढे, एएस न्युजचे संपादक अनिल साखरकर आदींची उपस्थिती होती. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पुजन व दिपप्रज्वलन करण्यात आले व त्यानंतर झाडांचे वृक्षारोपण करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. उपस्थित सर्व पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ए.एस न्युज महाराष्ट्रचे सहसंपादक तथा अखिल भारतीय ग्रामिण पत्रकार संघाचे तालुका सचिव राजीव शिवणकर यांनी तर संचालन जिया वाकोडे यांनी केले. रिबीन कापून कार्यालयाचे उद्घाटन पार पडले. सदर कार्यालयाला वर्धा लोकसभा मतदार संघाचे खासदार रामदास तडस व धामणगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रताप अडसड यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी अखिल भारतीय ग्रामिण पत्रकार संघाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस बाळासाहेब सोरगीवकर, प्रदेश कार्यकारिणी सदस्य उत्तमराव गावंडे, तालुका अध्यक्ष शहेजाद खान, पत्रकार बंडू आठवले, रितेश मुंधडा, संतोष वाघमारे, उमेश चौकडे, अमोल गवळी, इरफान पठाण, राजेश सराफी, गुड्डू शर्मा, राहुल देशमुख, नागेश वाडेकर, प्रल्हाद गायधने, निलेश अघम, शेखर गौतम, प्रमोद खवड, दत्ता जोशी, सुमेद सरदार, हर्षल वाघ, सचिन जयस्वाल, प्रशांत शिरभाते, बंडू आंबटकर, सविताताई गौतम, स्मिताताई शिवणकर, रिनाताई गायधने, ज्योतीताई निकम, संध्याताई सोनोने, शारदाताई वानखडे, ममताताई वाघमारे, अरविंद्र सोनोने, संग्राम इमले, संतोष शेन्डे, ऋषी गोखे, दिलीप निकम, संतोष वाघ, लोकेश मानकर,अतुल वैद्य, तेजस यादव, सुरज भस्मे. सुनील सदावर्ते, एकनाथ शिवणकर यांसह अनेकांची यावेळी उपस्थिती होती.

