“मेरी मिट्टी मेरा देश” अभियान यशस्वीपणे राबवा गटविकास अधिकारी संजय खारकर यांचे आवाहन

“मेरी मिट्टी मेरा देश” अभियान यशस्वीपणे राबवा गटविकास अधिकारी संजय खारकर यांचे आवाहन

 

MB – NEWS (चांदूर रेल्वे):- भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचे समारोपिय वर्षात शासनातर्फे विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहे. “मेरी मिटटी मेरा देश” अभियान संपुर्ण राज्यात व देशात राबविण्याकरीता शासनाकडून आलेल्या मागदर्शक सुचना नुसार तालुक्यात हे अभियान यशस्वी पणे राबवा असे आवाहन पस गटविकास अधिकारी संजय खारकर यांनी केले आहे.

एकुण पाच उपक्रम ग्रामपंचायती, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद स्तरावर दिनांक ०९ ते १४ ऑगष्ट २०२३ दरम्यान राबविण्यात येणार आहे. यामध्ये गावातील संस्मरणीय ठीकाणी शिलाफलकाची उभारणी करणे. वसुधा वदन म्हणून ७५ देशी वृक्षांची लागवड देशासाठी, स्वातंत्र्यासाठी व सुरक्षेसाठी बलीदान केलेल्या सैन्यदल आणि पोलीस दलातील निवृत्त विरांचा आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या परिवारातील सदस्यांचा सन्मान करणे, पंच प्रण ( शपथ), गावाक्षेत्रातील योग्य ठीकाणी राष्ट्रगीत गायनासह तिरंगा फडकविणे आदी उपक्रमांचा समावेश आहे. हा कार्यक्रम पंचायत समिती चांदूर रेल्वे मार्फतही राबविण्यात येणार आहे. अभियान दरम्यान ग्रा.पं. हद्दीतील २ ते ४ मुट माती गोळा करून पं.स. स्तरावरील समन्वयाचे माध्यमातुन दिनांक २७ ते ३० ऑगष्ट दरम्यान माती कलश मा. प्रधानमंत्री महोदयांचे कार्यक्रमासाठी पाठविण्यात येणार आहे. “मेरी मिटटी मेरा देश” अभियान यशस्वीपणे राबविण्याकरीता गावपातळीवर सर्व स्थानिक लोकप्रतिनिधी, पंचायत समिती सदस्य, सरपंच, युवक मंडळ, महोला बचतगट, शेतकरी मंडळे तसेच नागरीकांनी लोकसहभाग नोंदवावा असे आवाहन संजय खारकर, गटविकास अधिकारी यांनी केले आहे. मागील वर्षी प्रमाणे याही वर्षी १३ ते १५ ऑगष्ट २०२३ पर्यंत” हर घर तिरंगा ” उपक्रमाअंतर्गत सर्व कार्यालये आणि नागरीकांनी आपल्या घरावर तिरंगा फडकविण्याचे शासनाकडून आवाहन करण्यात आलेले आहे. मागील वर्षी व्यवस्थित जतन करुन ठेवलेला तिरंगा नागरीकांना पुन्हा वापरता येईल. असेही आवाहन श्री खारकर यांनी केले आहे.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे