तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय इमारतीचा लोकार्पण खासदार तडस यांच्या हस्ते सोहळा संपन्न
कोरोना काळात डॉक्टर व नर्सेसने रुग्णांची चांगली सेवा केली – खासदार तडस
MB NEWS (अमोल इंगोले) नांदगाव खंडे. शहर प्रतिनिधी:-तालुक्यातील महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या विभागापैकी असलेले आरोग्य विभागाचे तालुका स्तरावर अधिकारी कार्यालय नसल्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे गैरसोय होत होती व त्यामुळे शिकस्त बसण्याची वेळ अधिकाऱ्यावर आली होती तेव्हा जिल्हा परिषद विभागाकडून तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय इमारती करिता निधी उपलब्ध करून दिल्याने उप जिल्हा रुग्णालय परिसरात उभी झालेली चा कर पण सोहळा खासदार रामदास तडस यांच्या हस्ते पार पडला
तेव्हा पूर्ण काळात डॉक्टर व नर्स दिलेली सेवा यामुळे देशाला स्थिरता मिळाली व कोरोना काळात आशा वर्कर्स यांनी रुग्णांना जी मदत केली ते काम फार मोठे होते असे वक्तव्य मार्गदर्शन करताना खासदार खासदार तळस यांनी संबोधले तर यावेळी तालुक्यातील 50% पेक्षा जास्त पदे रिक्त असताना सुद्धा जे वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्रातील कंपाउंडर ची सुद्धा भूमिका बजावत आहे
अशा वैद्यकीय अधिकाऱ्यांचा खासदार रामदास तडस यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले तर यावेळी बोलताना गटविकास अधिकारी प्रकाश नाटकर यांनी रिक्त असलेली पदे तात्काळ कशी भरता येईल याकरिता प्रयत्न करावे अशी मागणी केली यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालय इमारतीचा लोकार्पण सोहळा पार पडला यामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
तर यावेळी या कार्यक्रमाला खासदार रामदास तडस यांच्या सह जिल्हा आरोग्य अधिकारी हर्षल क्षीरसागर, तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी, गटविकास अधिकारी प्रकाश नाटकर, वैद्यकीय अधिकारी नाथक, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.स्वप्निल मालखेडे, स्त्रीरोग तज्ञ प्रवीना देशमुख, जिल्हा क्षयरोग अधिकारी रमेश बनसोड, भारतीय जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्ष हरिश्चंद्र खंडाळकर,भाजपा नेते घनश्याम सारडा, माजी नगराध्यक्ष संजय पोफळे ,अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटना प्रदेश संघटक प्रदीप जोशी, भा.ज.यु.मोर्चा तालुका अध्यक्ष निकेत ठाकरे,महिला मोर्चा तालुकाध्यक्ष मोनाली बाभुळकर, अविनाश ब्राह्मणवाडे ,विस्तार अधिकारी आरोग्य सुनील खेडीकर, तालुका बालकल्याण अधिकारी वीरेंद्र गलफट,योगेश खंडार, नितेश कानबाले,अमोल इंगोले, अंकुश निम्नेकर,जयेंद्र वेरूळकर,आशिष रावेकर, विस्तार अधिकारी आरोग्य धुर्वे, रवी राऊत, मंगेश मानके, राजेश पवार, मनोहर मोरे,यांच्यासह तालुक्यातील पाचही प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी आशा वर्कर कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी या कार्यक्रमाचे संचालक राजीव मेश्राम यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. अशोक लांडगे यांनी केले

