दारूच्या नशेत रुग्णांवर डॉक्टरकडून उपचार
MB NEWS(महाराष्ट्रातील बातमीपत्र):-सातारा (प्रतिनिधी):-दारूच्या नशेत डॉक्टर रुग्णांवर उपचार करत असल्याचा प्रकार साताऱ्यातील पिंपोडे बुद्रूक येथे उघडकीस आला आहे.
अरूण जाधव असे या डॉक्टरचे नाव आहे. डॉक्टरांवर कारवाई करण्याची परिसरातील नागरिक मागणी करत आहे. गुरुवारी राऊतवाडी आणि वाघोलीचे रुग्ण रुग्णालयात उपचारासाठी आले होते.
तेव्हा जाधव यांनी दारूचे सेवन केल्याची शंका एका रूग्णाला आली. दरम्यान त्यांच्या गाडीची तपासणी करण्यात आल्यानंतर दारूच्या बाटल्या सापडल्या.

