Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

खडकपुरा चांदुर रेल्वे येथे तान्हा पोळाही मोठ्या उत्सहात साजरा* *पोळा उत्सव समितीचे आयोजन*

खडकपुरा चांदुर रेल्वे येथे तान्हा पोळाही मोठ्या उत्सहात साजरा* *पोळा उत्सव समितीचे आयोजन*

MB NEWS (चांदुर रेल्वे):-दरवर्षी भरत असलेला तान्हापोळा खडकपुरा चांदूर रेल्वे येथे मोठ्या प्रमाणात भरला असून पाऊस सुरू असतानाही पोळ्यामध्ये हजारोच्या संख्येने गर्दी झाली होती या पोळ्यामध्ये पुरुषासोबतच महिलांची सुद्धा मोठ्या प्रमाणात हजेरी लागली होती या पोळ्यामध्ये प्रथम क्रमांकाचे बक्षीस अनय पुडके ह्याला 2100 रुपयाचे तर दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस यश सदाफडे याला 1100 रुपयाचे तर तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस तनिश्क खाकोले याला पाचशे रुपयांचे देण्यात आले असून चौथे बक्षीस म्हणून साची कोहरे हिला देण्यात आले तर प्रोत्सांपर बक्षीस म्हणून 21 रुपयांचे 50पेक्षा अधिक बक्षिसे देण्यात आले आहे.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून चांदुर रेल्वे पोलीस स्टेशनचे दुय्यम ठाणेदार श्री महापुरे साहेब,न.प.चे मा. अध्यक्ष माननीय प्रभाकरराव वाघ,बबनराव भैसे बंडूभाऊ भैसे सह अनेक मान्यवर उपस्थित होते वयोवृद्ध शेतकरी म्हणून दामोदर होले,श्री सुमेरसिंगजी भैसे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार सुद्धा करण्यात आला असून या कार्यक्रमाचे संचालन हर्षल वाघ यांनी तर केशव वंजारी यांनी आभार मानले. याच कार्यक्रमात मोठ्या पोळ्यातील जोडिधारकाना सुध्धा बक्षीस वितरण करण्यात आले. त्यामधे पहिल्या क्रमांकाचे2100 रुपयांचे संदीप चौहान यांच्या तर्फे असलेले बक्षीस दिनेश ढेंगे यांच्या बैलजोडीला दुसऱ्या क्रमांकाचे 1100 रुपयांचे शुभम लाकडे यांच्या तर्फे सुरेश लांजेवार यांचे बैलजोडी तिसऱ्या क्रमांकाचे 701 रुपयांचे बक्षीस राजकुमार बेराड यांचे तर्फे विजय गोखे यांचे बैल जोडीला चौथ्या क्रमांकाचे 601 रुपयांचे बक्षीस देवानंद वंजारी यांचे तर्फे निखिल होले यांचे बैल जोडीला पाचव्या क्रमांकाचे 551 रुपयांचे बक्षीस रुपेश भोयर यांचे तर्फे अरविंद वणवे यांचे बैल जोडीला सहाव्या क्रमांकाचे बक्षीस 501 रुपयांचे हर्षल वाघ यांचे तर्फे प्रशांत दिडपाये यांचे जोडीला देण्यात आले.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे