नांदेडमध्ये 24 तासात 24 जणांचा मृत्यू..

नांदेडमध्ये 24 तासात 24 जणांचा मृत्यू

MB NEWS (महाराष्ट्रातील बातमीपत्र):-नांदेडमधून अत्यंत धक्कादायक घटना समोर येत आहे. येथील शासकीय रूग्णालयात 24 तासात 24 जणांचा मृत्यू झाला आहे. यात 12 नवजात बालकांचा समावेश आहे. वेळेत औषधांचा पुरवठा होत नसल्याचा आरोप येथील रूग्णांनी केला आहे.

नांदेडच्या डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. सर्पदंश आणि विषबाधेमुळे 12 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

 

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे