Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

श्री क्षेत्र सावंगा (विठोबा) येथे “दसरा-यात्रा महोत्सव झेंडे चढविण्याचा चित्त थरारक नेत्रदीप कार्यक्रम

श्री क्षेत्र सावंगा (विठोबा) येथे “दसरा-यात्रा महोत्सव झेंडे चढविण्याचा चित्त थरारक नेत्रदीप कार्यक्रम

MB NEWS :- महाराष्ट्रातील विदर्भात प्रसिद्ध लाखो लोकांचे श्रद्धास्थान असलेले चांदुर रेल्वे तालुक्यातील श्री क्षेत्र सावंगा (विठोबा) येथील श्री विठोबा संस्थान उर्फ श्रीकृष्ण अवधूत बुवा संस्थान येथे दिनांक २४/१०/२०२३ मंगळवारला दुपारी १२.०० वाजता संस्थानच्या वतीने संस्थानमध्ये “चंदन- उटीचा- कार्यक्रम” आणि दुपारी ४.०० वाजता “दसरा” निमित्त महाराजांचे “झेंडे चढविण्याचा” चित्त थरारक नेत्रदीप कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला असून कापुराच्या अखंड ज्योतीने आणि भजनाच्या गजरात संस्थानचे विश्वस्त मंडळ आणि असंख्य भाविकांचे उपस्थितीत संपन्न होणार आहे.
*संस्थानचे विश्वस्त चरणदास नामदेवराव कांडलकर रा. सावंगा (विठोबा) हे नवीन वस्त्र परिधान करून यांचे शुभ हस्ते महाराजांच्या बोहलीची विधीवत पूजा तसेच दोन्ही झेंड्याची पूजा करून नवीन खोळ(कापड) घालण्याकरिता या दोन्ही झेंड्याला पायाचा स्पर्श न लागू देता दोरांच्या सहाय्याने झेंडे चढविण्याच्या कार्यक्रमाला सुरुवात विश्वस्त मंडळाचे उपस्थित करण्यात येणार आहे.*
*बाहेर गावावरून येणारे भाविकांकरिता संस्थानचे अन्नदान समितीच्या वतीने भोजनाचे आयोजन करण्यात आले आहे.*
*तसेच या मांडीमध्ये बाहेर गावावरून भजनासाठी येणारे अवधूत भजन मंडळाकरीता दैनंदिन भोजन,नास्ता आणि चहा इ. व्यवस्था करण्यात आली आहे .*
*तरी सर्व भाविक- भक्तांनी तन-मन-धनाने सहकार्य करून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, तसेच यात्रेत शांतता व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने स्वयंशिस्तीचे पालन करावे, अशी विनंती विश्वस्त मंडळाच्या वतीने करण्यात येत आहे.*

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे