Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

महारुद्र नगरात लोकसहभागातून स्वच्छता अभियान लोकप्रतिनिधी व प्रशासनाने दुर्लक्ष

 महारुद्र नगरात लोकसहभागातून स्वच्छता अभियान लोकप्रतिनिधी व प्रशासनाने दुर्लक्ष

 

MB NEWS(चांदूर रेल्वे):-नगर परिषद हद्दीतील महारुद्र नगरमध्ये जंगली झाडे,काटेरी झुडुपे व अस्वच्छता वाढल्यामुळे आज स्थानिक नागरिकांनी लोकवर्गणी गोळा करून नगरातील परिसराची स्वच्छता अभियान राबवून नगरातील वाढलेली जंगली झाडे,काटेरी वृक्ष,गाजर गवत नाल्यांमधील कचरा काढुन स्वच्छता केली.या परिसरातील लोकप्रतिनिधी व प्रशासनाने गेल्या दहा वर्षांमध्ये महारुद्र नगर मध्ये प्रार्थमिक सुविधा रोड,नाल्या,नळ योजना, मुलांना खेळाचे मैदान दिले नाही अश्या अनेक समस्या परिसरातील नागरिकांना भासत असून प्रशासनाने व लोकप्रतिनिधी यांनी दुर्लक्ष केले म्हणून महारुद्र नगरातील नागरिकांनी कंटाळून स्वतः पुढाकार घेऊन स्वतःच्या वर्गणी गोळा करून स्वच्छता मोहीम हाती घेत परीसर स्वच्छ केली यावेळी राजू देवके,संजय ठाकूर,महाजन सर,बिट्टू मेश्राम,आकाश मोटघरे,गोपाळ गणेशकर,महेश यावले, सुरेंद्र मस्केसह नगरातील असंख्य नागरीक उपस्थित होते.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे