राजर्षी शाहू सायन्स कॉलेज चांदुर रेल्वे येथे सत्कार समारंभ, तसेच महाविद्यालयाला A दर्जा प्राप्त 

राजर्षी शाहू सायन्स कॉलेज चांदुर रेल्वे येथे सत्कार समारंभ, तसेच महाविद्यालयाला A दर्जा प्राप्त 

MB NEWS(महाराष्ट्रातील बातमीपत्र):-स्थानिक चांदुर रेल्वे येथील राजर्षी शाहू सायन्स कॉलेज ला 18 व 19 ऑक्टोबर 2023 रोजी राष्ट्रीय मूल्यांकन आणि अधिस्वीकृती परिषद अर्थात नॅशनल असेसमेंट अँड अॅक्रिडेशन कौन्सिल (NAAC) समितीने भेट दिली. सदर संस्था उच्च शिक्षण आणि इतर शैक्षणिक संस्थांच्या मूल्यांकनास मान्यता देते. गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षणासाठी सर्वपरिचित अशा या महाविद्यालयाची मूल्यांकनाला समोर जाण्याची ही दुसरी वेळ होती. त्रिसदस्य समिती सदस्यांनी महाविद्यालयाचे मूल्यांकन केले. या भेटीदरम्यान त्यांनी महाविद्यालयातर्फे राबविला जाणाऱ्या शैक्षणिक कार्याची दखल घेऊन महाविद्यालयाला A दर्जा CGPA: 3.01 दिला.

सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अतुल विद्या मंदिर संस्थेच्या अध्यक्षा प्रा. सौ उत्तराताई जगताप, प्रमुख अतिथी म्हणून उपाध्यक्षा डॉ. सौ वैष्णवीताई जगताप, सचिव प्रा. डॉ. वीरेंद्र भाऊ जगताप, श्री.एस. बी. देशमुख, प्रा प्रभाकर वाघ, श्री.प्रदीप वाघ, श्री.गणेश आरेकर, श्री.श्रीकांत गावंडे, डॉ.सीमा जगताप, श्री.सिट्टू भाऊसूर्यवंशी प्रामुख्याने उपस्थित होते. अतुल विद्या मंदिर संस्थेच्या अध्यक्षा प्रा. सौ. उत्तराताई जगताप, सचिव प्रा. डॉ वीरेंद्र भाऊ जगताप, उपाध्यक्ष डॉ.सौ. वैष्णवीताई जगताप, यांच्या हस्ते प्रभारी प्राचार्य डॉ एम. पी. चिखले, समन्वयक डॉ. मीनल जे. केचे व तसेच सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला. मुलांकनामध्ये कॉलेजला A दर्जा देण्यात आला. कॉलेजला हे दर्जा मिळणे म्हणजे उत्कृष्ट गुणवत्तेचे प्रतीक आहे. त्यासाठी प्राध्यापक रुंद यांनी अपार मेहनत घेतली असे प्रा. डॉ वीरेंद्र भाऊ जगताप यांनी आपल्या भाषणात नमूद केले.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे