मोटार सायकल व कारची समोरासमोर धडक मोटर सायकल स्वार गंभीर जखमी
MB NEWSचांदूर रेल्वे :-अमरावती रोडवरील मांजरखेड कसबा जवळील अग्रवाल पेट्रोल पंपासमोर बुधवार सांयकाळी 5 वाजता चे दरम्यान अमरावती कडुन येणारी कार क्रमांक एम एच – 28बीके 5204 आणि विरुद्ध दिशेने येणारी मोटार सायकल क्रमांक एम एच 27 डीजे 0108 यांची समोरासमोर धडक झाल्याने मोटार सायकल स्वार अनील चव्हाण रा – अमरावती हे गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. जखमी झालेल्या अनील चव्हाण यांना पुढील उपचारासाठी अमरावती येथे रेफर करण्यात आल्याचे समजते.
पुढील तपास चांदुर रेल्वे पोलीस स्टेशन करीत आहे.

