Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

भाजपा युवा मोर्चा विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्षपदी तेजस वाट यांची नियुक्ती

भाजपा युवा मोर्चा विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्षपदी तेजस वाट यांची नियुक्ती

MB NEWS (महाराष्ट्रातील बातमीपत्र)चांदूर रेल्वे : भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी नुकतीच युवा मोर्चाची जिल्हा कार्यकारीणी जाहीर केली. यामध्ये भाजपा युवा मोर्चा विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्षपदी चांदूर रेल्वे शहरातील तेजस रमेश वाट यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या संदर्भातील असलेले प्रश्न युवा मोर्चाच्या माध्यमातून आगामी काळात प्रभावीपणे सोडविण्यासाठी संपूर्ण पदाधिकारी काम करतील असा
तेजस रमेश वाट हे विद्यार्थ्यांच्या न्यायाकरिता नेहमीच झटत असतात. याचीच दखल घेऊन त्यांची भाजपा युवा मोर्चा विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्षपदी वर्णी लावण्यात आली. खा. डॉ. बोंडे व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत नियुक्तीपत्र त्यांना देण्यात आले.

तेजस वाट यांच्या नियुक्तीमुळे विद्यार्थीवर्गात चैतन्य निर्माण झाले आहे. नियुक्तीनंतर बोलतांना तेजस वाट यांनी म्हटले की,माझ्यासारख्या सर्व सामान्य कुटुंबातील व्यक्तीला जिल्हाध्यक्ष डॉ. अनिल बोंडे व युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अजिंक्य वानखडे यांनी युवा मोर्चा विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष पदाची मोठी जबाबदारी दिली, ही फार मोठी गोष्ट आहे. आणि हीच सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय देणारी खरी भाजपा आहे, असे मत तेजस वाट यांनी व्यक्त करत पदाला न्याय देऊन मला दिलेल्या संधीचे पूर्णपणे सोने करणार असल्याचे सांगितले.

 

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे