विकासकामांना प्रारंभ, गॅस कनेक्शनचे वितरण आणि कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश
MB NEWS (महाराष्ट्राची बातमीपत्र )तिवसा :-आमदार ॲड. यशोमती ठाकूर यांच्या प्रयत्नांनी तिवसा तालुक्यात मंजूर झालेल्या रस्त्याची सुधारणा, लहान पुलाचे बांधकाम, तलाठी कार्यालय, सौंदर्यीकरण आदी विकासकामांना नुकताच प्रारंभ झाला. यावेळी स्वामी श्री रामराजेश्वराचार्य समर्थ माऊली सरकार प्रामुख्याने उपस्थित होते तसेच महिलांना उज्वला गॅस कनेक्शनचे वितरण आणि बोर्डा येथील कार्यकर्त्यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश पार पडला.
तिवसा तालुक्यातील विकास कामांकरिता निधी मिळावा यासाठी आमदार ॲड. यशोमती ठाकूर यांनी सातत्याने शासन पातळीवर पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश आले आहे. यामध्ये जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत ममदापूर पोच मार्गाच्या सुधारणेसाठी 25 लक्ष निधी तसेच वणी सुलतानपूर ग्रामीण मार्गाच्या सुधारणेसाठी 11 लक्ष रुपये तर अमरावती तालुक्यातील नांदगांव पेठ-शेवती रस्त्यावर जिल्हा वार्षिक योजना, जि.प. अंतर्गत लहान पुलाच्या बांधकामकरिता 39 लक्ष रुपये तसेच तिवसा तालुक्यातील श्रीक्षेत्र कौंडण्यपूर येथील श्री रुख्मिणी विदर्भ पीठ येथील परिसराच्या सौंदर्यीकरणासाठी 2 कोटी रुपये निधी. वरखेड-मारडा-जहाँगीरपूर या मार्गावर लहान पुलाच्या बांधकामासाठी 2.50 कोटी रुपये तसेच बोर्डा येथील तलाठी कार्यालयाच्या बांधकामाकरिता 30 लक्ष रुपये. भिवापूर ग्रामीण मार्गावरील बोर नदीवरील लहान पुलाचे बांधकाम करण्याकरिता अर्थसंकल्पाअंतर्गत 3 कोटी रुपये तर भिवापूर येथील तलाठी कार्यालयाच्या बांधकामाकरिता 30 लक्ष रुपये निधी मंजूर झाला होता. या सर्व विकासकामांना नुकताच आमदार ॲड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते भुमिपुजन करुन प्रारंभ झाला.
यावेळी माजी महापौर विलास इंगोले, तिवसा पं.स. च्या सभापती कल्पना दिवे, उपसभापती रोशनी पुनसे, पं.स. सदस्य शिल्पा हांडे, तिवसा तालुका काँग्रेस कमेटिचे अध्यक्ष सतिश पारधी, सरपंच अतुल राऊत, उपसरपंच संगिता नागदेवते, विजय राऊत, रितेश पांडव, प्रफुल्ल देशमुख, दिलीप वानखडे, सुधिर बोके, सचिन मडावी, मनोज ढोणे, लता गोरले, संदिप आमले, रविंद्र हांडे, मारोत वऱ्हाडे, तुळशीदास भगत, भारत ढोणे, सचिन सोटे, तिवसा बाजार समितीचे सभापती रवि राऊत, रणजित राऊत, मुर्तिजापूर तरोडा च्या सरपंच प्रियंका गडलिंग आदी उपस्थित होते.
उज्वला गॅस कनेक्शनचे वितरण
आमदार ॲड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते गरजू महिलांना उज्वला गॅस कनेक्शनचे वितरण करण्यात आले. यावेळी तिवसा नगरपंचायत अध्यक्ष योगेश वानखडे, उपाध्यक्ष प्रिया विघ्ने, गजानन राजगुरे, नगरसेविका सूवर्णा आमले, अर्चना राजगुरे, सुरवाडी ग्रामपंचायत सरपंच ललिता बोराडकर, नगरसेवक वैभव वानखडे, शहर काँग्रेसचे अध्यक्ष सेतु देशमुख, अजय आमले, नरेंद्र विघ्ने, रोशन ठाकरे, हरिष गुल्हाने, वैष्णवी काजळकर, प्रशांत सुरोसे आदी उपस्थित होते.
कार्यकर्त्यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश
आमदार ॲड. यशोमती ठाकूर यांच्या उपस्थितीत तालुक्यातील बोर्डा येथील असंख्य कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला. यामध्ये संदेश उबाड, मनोज ढोणे, अजय हुडे, ऋषिकेश रोंघे, तेजस सोनोने, तेजस हुडे, रोहण राऊत, श्रीकांत ठाकरे, हर्षल राऊत, निनाद राऊत, साहिल गौरखेडे, चेतन गौरखेडे, अभिजीत दवाडे, योगेश रोंघे, गोकुळ गौरखेडे, प्रतिक शेंडे, सचिन मडावी, सुरज सोनोने, शुभम भोयर आदींचा समावेश आहे.

