Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

शेतकऱ्यांची थट्टा होत असताना पालकमंत्री झोपलेत का?पीकविम्याच्या मुद्द्यावर भडकल्या आमदार अॅड. यशोमती ठाकूर.

शेतकऱ्यांची थट्टा होत असताना पालकमंत्री झोपलेत का?पीकविम्याच्या मुद्द्यावर भडकल्या आमदार अॅड. यशोमती ठाकूर.

MB NEWS(महाराष्ट्रातील बातमीपत्र)अमरावती:- विदर्भातील शेतकऱ्यांची शासनानं थट्टा चालवलीय. पीकविम्याची रक्कम अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली नाही. या मुद्द्यावरून विदर्भात अनेक ठिकाणी आंदोलनही सुरू आहे. असं असताना अमरावतीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील झोपलेत का, असा सवाल तिवसा मतदारसंघाच्या काँग्रेस आमदार अॅड. यशोमती ठाकूर यांनी केलाय.

गुरुवारी (ता. १६) त्यांनी अमरावती येथे पीकविम्याच्या मुद्द्यावर बोलताना ॲड. ठाकूर म्हणाल्या की, विदर्भ आणि उर्वरित महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये शासन भेद करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
शासनाने अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मस्करी करणं लावलंय. आपण या मुद्द्यावर विधिमंडळात आवाज उठविणार आहोत. त्यासाठी आधीच आपण प्रश्न दाखल केलाय. बीड जिल्ह्यामध्ये पीकविमा कंपनी २४१ कोटी रुपये देत आहे. बीडमध्ये शेतकरी राहतात, मग अमरावती जिल्ह्यात काय जनावरं राहतात काय, असा संतप्त सवालही आमदार अॅड. ठाकूर यांनी केला. अमरावती जिल्ह्यात १० हजार शेतकऱ्यांसाठी फक्त आठ लाख देण्यात आले आहेत, असं त्या म्हणाल्या.

पीकविम्याची ही रक्कम देत असताना अमरावतीचे पालकमंत्री काय झोपा काढतात काय, असं नमूद करीत त्यांनी चंद्रकांत पाटील यांना लक्ष्य केलं. शासन शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर अजिबात गंभीर नाही. त्यामुळं आता शेतकरी सत्ताधाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत माफ करणार नाही. शासनानं शेतकऱ्यांना गृहित धरणं बंद न केल्यास प्रसंगी रस्त्यावर उतरत आंदोलन करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. विदर्भातील शेतकरी वेगळा, मराठवाड्यातील वेगळा, पश्चिम महाराष्ट्रातील वेगळा असा भेद आतापर्यंत कुणीही केला नव्हता. परंतु सध्याचं शासन असा भेद करताना दिसतंय, असा आरोपही अॅड. ठाकूर यांनी केला.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे