Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

चांदुर रेल्वे शहरांमध्ये सक्रिय कुष्ठरुग्ण व क्षय रुग्ण शोध मोहीम

चांदुर रेल्वे शहरांमध्ये सक्रिय कुष्ठरुग्ण व क्षय रुग्ण शोध मोहीम

MB NEWS(चांदुर रेल्वे) :-महाराष्ट्र शासनाने सन २०१७ पर्यंत कुष्ठरोगाची संसर्गिक साखळी खंडित करण्याचे उद्देशाने दिनांक २० नोव्हेंबर 2023 ते 6 डिसेंबर 2023 दरम्यान चांदुर रेल्वे शहरांमध्ये सक्रिय कुष्ठरुग्ण व क्षय रुग्ण शोध मोहीम राबविण्यात येत आहे या मोहिमेमध्ये अति जोखीम असलेल्या भागांमध्ये घरोघरी सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणा दरम्यान सर्व पुरुष, स्त्री व लहान बालके यांची संपूर्ण तपासणी करण्यात येणार आहे.

आपल्या शरीरावरील लालसर फिक्कट बधीर चट्टा, कानाच्या पाळ्या जाड होणे, हातापायांमध्ये सतत मुंग्या येणे व बधिर वाटणे, चेहरा तेलकट व चकाकणारा गुळगुळीत होणे ही लक्षणे कुष्ठरोगाची असू शकते तसेच पंधरा दिवस सतत खोकला, रात्री बारीक ताप, वजनात हळूहळू घट होणे ही लक्षणे क्षय रोगाची असू शकते तेव्हा आपल्या घरी सर्वेक्षणासाठी येणाऱ्या कर्मचारी किंवा स्वयंसेवक यांना सहकार्य करावे आणि त्यांचेमार्फत आपली तपासणी करून घ्यावी दिलेल्या पैकी कोणतेही लक्षणे आढळल्यास सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये मोफत तपासणी करून औषधोपचार सुरू करण्यात येईल व आपण या आजारातून संपूर्णपणे मुक्त व्हाल असे.

आवाहन वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय चांदुर रेल्वे मार्फत करण्यात येत आहे.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे