Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

अमरावतीसह राज्यात पुढील ३-४ दिवस मेघगर्जनेसह पाऊस; २५ जिल्ह्यांना यलो अलर्ट..

🌧️ अमरावतीसह राज्यात पुढील ३-४ दिवस मेघगर्जनेसह पाऊस; २५ जिल्ह्यांना यलो अलर्ट..

     अमरावतीसह राज्यातील २५ जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता हवमान विभागाने व्यक्त केली असून २५ जिल्ह्यांना यलो अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे.

⛈️ *कुठे होणार पाऊस?*
राज्यात २७ आणि २८ नोव्हेंबर रोजी पावसाची शक्यता असून ठाणे, पालघर, मुंबई, रायगड आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

🌳 *झाडे उन्मळून पडली*
अवकाळी पावसासोबत जोराचा वारा असल्याने विविध ठिकाणी झाडे उन्मळून पडली असून तसेच अनेक घरांवरील पत्रे उडून गेले आहेत. कोरडवाहू शेतकरी मात्र या पावसाने समाधानी झाल्याचे दिसून येत आहे.

🌨️यासोबतच विदर्भात बुलढाणा, अकोला, चंद्रपूर, गडचिरोली, वाशिम, अमरावती आणि यवतमाळ आणि उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, नंदुरबार आणि धुळे या जिल्ह्यांना देखील यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात पावसाच्या आगमनाने येत्या काही दिवसात शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे