आमदार प्रताप दादा अडसड यांच्या नेतृत्वामध्ये शेकडो कार्यकर्ते यांचा भा. ज. पा मध्ये जाहीर प्रवेश.
MB NEWS (चांदुर रेल्वे ):-चांदुर रेल्वे तालुक्यातील बग्गी येथील सामाजिक कार्यकर्ते देविदासजी शेबे यांच्यासोबत दामोदर कळव,श्रीरामजी तिवाडे,सतीश कासार,रोशन मारबदे तसेच शेकडो कार्यकर्त्यांनी आज भारतीय जनता पक्षामध्ये धामणगाव रेल्वे विधानसभेचे कर्तव्यदक्ष आमदार प्रताप दादा अडसड यांच्या नेतृत्वामध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी सौ.अर्चनाताई रोठे,धामणगाव विधानसभा प्रमुख श्री.रावसाहेब रोठे, चांदुर रेल्वे तालुकाध्यक्ष बबनरावजी गावंडे,ओबीसी धामणगाव विधानसभा प्रमुख समीर भेंडे, रोशन बोडखे ,प्रकाश चव्हाळे,गोपाल गजभिये इतर कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

