चांदूर रेल्वेत ‘संविधान सन्मान दिन‘ साजरा
MB NEWS (चांदूर रेल्वे) :-स्थानिक नगर विकास संघर्ष समिती,डॉ.पंजाबराव देशमुख जेष्ठ नागरिक संघ,संयुक्त किसान मोर्चा आणि संयुक्त कामगार संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने चांदूर रेल्वे तहसिल कार्यालय समोर २६नोव्हेंबर हा ‘संविधान सन्मान दिन’ साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी तालुका वकील संघाचे अध्यक्ष अॅड.शिवाजीराव देशमुख तर प्रमुख वक्ते म्हणून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे संत गाडगे बाबा अध्यासनाचे प्रमुख व समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.दिलीप काळे उपस्थित होते.सर्वप्रथम भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर व मसुदा समितीचे सदस्य डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते हारार्पण करून अभिवादन करण्यात आले.तसेच याप्रसंगी सर्वांनी संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन केले.
तालुका कम्युनिस्ट पक्षाचे सचिव कॉ.सतीश चौधरी व प्रभाकर अर्जापुरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.तर प्रमुख वक्ते प्रा.दिलीप काळे यांनी आपल्या अभ्यासपूर्ण विचारांद्वारे संविधानातील परिशिष्टविषयी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष अॅड.शिवाजीराव देशमुख यांनी मसुदा समितीने घेतलेल्या परिश्रमापासून संविधान सभेची मंजुरी व २६ जानेवारी १९५० ला घटना अंमलात येईपर्यंतचा इतिहास विषद केला.तसेच यावेळी बादल गडलिंग यांनी मरणोत्तर देहदानाचा संकल्प केला.राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक काँ.देवीदास राऊत यांनी केले.संचालन प्रा.आनंद देशमुख आणि आभार सतीश देशमुख यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सतीश देशमुख,अच्युत मोहोड,विनोद काळमेघ,नरेश थूल,रमेश कांबळे,धनराज राऊत,मेजर डोंगरे यांचे विशेष सहकार्य लाभले.यावेळी माजी प्राचार्य प्रा.
प्रसेनजीत तेलंग, अशोक देशमुख,प्रकाश याहुल,अशोक नंदेश्वर,प्रा.सुनील चौधरी,नानासाहेब डोंगरे,भीमराव दुर्योधन,बंडू आठवले,मेजर बागडे,पुरुषोत्तम बनसोड,आनंद भगत,मुन्ना मंडपे,पत्रकार खडसे,देवानंद गवई,अनिल वरघट,काँ .विनोद जोशी,आजाद चोरडिया,बाळासाहेब यादव,संजय बाबर,मुकूंद तिरथकार,विजय दुर्योधन,संजय गोसावी,संजय बनसोड,विलास आठवले,राजेंद्र पाटील,शिवदास भगत,प्रदीप गेडाम,ए.ए.घोडेस्वार,कमलकिशोर पनपालिया,रामदास कारमोरे,अतुल मेटे,हरिदास राऊत,नजीरभाई,राजू कडूकार,राजेश मंजुरकर,अशोक गवई,हरिभाऊ चव्हाण,नितिन शाहू,सुरेश मडावी,राजेश बनसोड,भास्कर बनसोड,साखरकर,शालीकराम धुर्वे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

