Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

तिवसा येथे घरात घुसून सराफा व्यापाऱ्याची हत्या; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

तिवसा येथे घरात घुसून सराफा व्यापाऱ्याची हत्या; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

MB NEWS 365(अमरावती):-अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथे काल भरदिवसा सुवर्णकाराच्या घरात घुसून त्याची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. यात अज्ञात आरोपींनी सोने, चांदी व नगदी रोख रक्कम सह तब्बल 75 लाखांचा ऐवज लंपास गुन्हा दाखल केला होता. संजय मांडळे वय 54 वर्ष असं मृतक सुवर्णकाराचे नाव असून मृतक मांडळे हे आपल्या राहत्या घरी होते. दरम्यान घरी कोणी नसतांना अज्ञात चोरट्याने घरात शिरून धारधार शस्त्राने हत्या करून घरातून 75 लाखांचा मुद्देमाल चोरून नेला. तर तिवसा पोलिसांनी खुणासह चोरीचा गुन्हा करण्यात आला होता. 24 तासानंतर अमरावती ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या पथकाने आरोपी रोशन तांबटकर वय 25 राहणार देऊरवाडा याला ताब्यात घेऊन विचारपूस करण्यात आली आरोपीने उडवा उडवीचे उत्तर दिले.

पोलिसांनी आरोपीला पुन्हा विश्वासात घेऊन विचारपूस केली असताना आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली व आरोपी कडून 7 लाख 75 हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. पुढील गुन्ह्याचा तपास पोलीस करीत आहे.

 

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे