विकसित भारत संकल्प यात्रेचे घुईखेड ग्रामपंचायत मध्ये भव्य स्वागत…

विकसित भारत संकल्प यात्रेचे घुईखेड ग्रामपंचायत मध्ये भव्य स्वागत…

MB NEWS(मंगेश बोबडे) चांदुर रेल्वे :विकसित भारत संकल्प यात्रा ही देशव्यापी मोहीम केंद्र शासनाकडून दिनांक 15 नोव्हेंबर 2023 ते 26 जानेवारी 2024 या कालावधीत राबवण्यात येत आहे .बिरसा मुन्डा यांचे जयंती पर्वावर या यात्रेचा शुभारंभ झाला. देशातील सर्व ग्रामपंचायती मध्ये ही यात्रा जात आहे. या यात्रेचा उद्देश माहितीचा प्रसार व योजनांबाबत जागरूकता निर्माण करणे ,सरकारी योजनांचा प्रचार व प्रसार घरोघरी करणे.

विकसित भारत संकल्प यात्रेचे ग्रामपंचायत घुईखेड मध्ये 29 नोव्हेंबर ला आगमन झाले. प्रथम केंद्र शासन योजनांच्या चित्रफित रथाचे पूजन घुईखेडच्या सरपंच सौ. वर्षालता हेमंत जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला श्री .खारकर B.D.O. पंचायत समिती चांदुर रेल्वे, व श्री .चव्हाण विस्तार अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान सरपंच मॅडम सौ.वर्षलता जाधव यांनी भूषविले प्रमुख पाहुणे म्हणून सौ. विद्या रवींद्र उदयकर माजी सभापती पंचायत समिती चांदुर रेल्वे या होत्या. श्री.शरद गुल्हाने तंटामुक्ती अध्यक्ष, श्री.अनिल भाऊ वानखडे उपसरपंच, डॉ. श्री.मुंढे आरोग्य अधिकारी p.H.C. घुईखेड, डॉ. श्री.सातव पशुवैद्यकीय अधिकारी, श्री.कुरवाडे सर मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळा उपस्थित होते, कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते फोटोंचे पूजन व दीप प्रज्वलनाने व प्रार्थनेने झाली. स्वागत गीत श्रीमती आंबुलकर ताई यांनी सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक खारकर सर यांनी केले.

कार्यक्रमांमध्ये अंगणवाडी ताईंनी स्वच्छता गीत सादर केले. व आशा ताईंनी कृष्टरोग नाटिका व हात धुण्याच्या सहा पद्धती व त्यांचे प्रात्यक्षिक सादर केली. घुईखेड ग्रामपंचायतला हर घर जल व O.D.F. प्लस चे प्रमाणपत्र B.D.O. श्री खारकर यांच्या हस्ते देऊन गौरवण्यात आले. “हमारा संकल्प विकसित भारत” ही प्रतिज्ञा श्री.राहुल गवई स्वच्छता अभियान गट समन्वयक यांनी सर्वांना दिली.भारत गॅस एजन्सी चे संचालक श्री.अरुण भाऊ जयस्वाल यांनी पंतप्रधान उज्वला गॅस योजना चे लाभार्थ्यांना गॅस वाटप केले. सौ सुजाता जाधव, व सौ. अर्चना गावंडे उज्वला गॅस योजनेच्या लाभार्थ्यांनी योजनेबद्दल मनोगत व्यक्त केले. गोल्डन कार्ड लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले. पंतप्रधान घरकुल योजनेबद्दल श्री सचिन मेहर यांनी आपले विचार मांडले. पी एम किसान सन्मान योजनेचे लाभार्थी श्री.शरद भाऊ गुल्हाने यांनी या योजनेबद्दल माहिती दिली. पंतप्रधान गरीब कल्याण योजना च्या लाभार्थी सौ.सुलुबई कोठाळे यांनी मनोगत व्यक्त केले. भाग्यश्री योजनेच्या लाभार्थी सौ.अपर्णा क्षीरसागर यांनी आपले विचार मांडले. अहिल्याबाई होळकर पुरस्कार प्राप्त श्रीमती प्रमिला उदयकर व स्वच्छता अभियान यावरती सौ.सुवर्णा गजानन गावंडे यांनी आपले विचार मांडले लघु उद्योजिकता सौ मीना गिरी यांनी आपल्या उद्योगाबद्दल सर्वांना माहिती दिली. तसेच प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेतील लाभार्थी सौ. अश्विनी ज्ञानेश्वर धांडे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना तालुकास्तरीय लंगडी खेळामध्ये प्रथम आल्याबद्दल सन्मान करण्यात आला. व स्वच्छता रन मध्ये भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच जेंडर प्रतिज्ञा बचत गटच्या C.R.P. यांच्यातर्फे घेण्यात आली. कार्यक्रमांमध्ये P.H.C. घुईखेड तर्फे मेडिकल कॅम्प लावण्यात आला होता .व फवारणी द्रोण चे प्रात्यक्षिक झाले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.अर्चना हेमंत शीलनकर यांनी केले व आभार प्रदर्शन श्री अनिल भाऊ वानखेडे उपसरपंच यांनी केले. कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य श्री.विवेक भाऊ काकडे, श्री.लहानु मेश्राम ,सौ.पूजा पवार , श्री.सचिन गुल्हाने, सौ संगीता गिरुळकर व ग्रामसेवक श्री.शिरसाट सर ,श्री.बिरे सर ,श्री.प्रभाकर जुनघरे,श्री घनश्याम नंदरधने ,श्री.अजय तोवर, श्री महेंद्र काकडे, श्री.किशोर क्षीरसागर. मोनिका मनगटे प्रभाग समन्वयक बचत गट,सौ.गाढवे आशा गट समन्वयक, गावातील प्रतिष्ठित नागरिक डॉ. श्री.हेमंत जाधव, श्री.उमाकांत जमदापुरे, श्री.संजय भाऊ गिरुळकर, श्री.किशोर नरगडे ,श्री.विश्वेश्वर गावंडे , बचत गट महिला सौ.उज्वला वरघट, बचत गट महिला मंडळी,आशा सेविका अंगणवाडी सेविका CRP सौ.अर्चना वानखडे ,प्रिया शेख, व युवा वर्ग उपस्थित होते .

 

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे