Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

श्री क्षेत्र सावंगा (विठोबा) नगरीत “अमावस्या” निमित्त “चंदन-उटी-कार्यक्रम”

श्री क्षेत्र सावंगा (विठोबा) नगरीत “अमावस्या” निमित्त “चंदन-उटी-कार्यक्रम”

MB NEWS (महाराष्ट्रातील बातमीपत्र):-चांदुर रेल्वे तालुक्यातील श्री क्षेत्र सावंगा (विठोबा) येथील श्री विठोबा संस्थान उर्फ श्रीकृष्ण अवधूत बुवा संस्थान येथे दिनांक १२/१२/२०२३ मंगळवारला दुपारी ४.०० वाजता संस्थानचे वतीने “अमावस्या” निमित्त “चंदन – ऊटीचा” कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.
*या कार्यक्रमाला येणाऱ्या भाविकांकरिता संस्थानचे अन्नदान समितीच्या वतीने भोजनाची व्यवस्था म्हणून महाप्रसादाचे आयोजन यावेळी दोन ठिकाणी करण्यात येणार आहे.१)संस्थानचे भक्त निवास हाॅल आणि २) संस्थानचे प्रसादालय. ज्या भाविकांना विना प्रसाद देणगी शुल्क प्रसाद घ्यावयाचा आहे,त्यांची व्यवस्था संस्थानचे भक्त निवास हाॅल मध्ये आणि ज्या भाविकांना प्रसाद देणगी शुल्क ₹ ४०/- जमा करून पावती द्वारे प्रसाद घ्यावयाचा आहे, त्यांची व्यवस्था संस्थानचे प्रसादालयामध्ये करण्यात येणार आहे,तरी सर्व भाविक भक्तांनी स्वयं शिस्तीचे पालन करून या महाप्रसादाचा लाभ घ्यावा

*संस्थानमध्ये बाहेरगावावरून येणाऱ्या भाविकांकरिता दैनंदिन भोजनाची व्यवस्था म्हणून संस्थानच्या वतीने “भोजन-प्रसादालय” सुरू करण्यात आले आहे. भाविकांकरिता भोजन सुविधा दुपारी १२.०० ते १.३० आणि रात्री ८.०० ते ९.३० कालावधीमध्ये चालू ठेवण्यात आली आहे. या करिता सकाळी ९.०० ते ११.०० आणि सायंकाळी ५.०० ते ७.०० या कालावधीत भोजन प्रसाद देणगी पावती संस्थानचे देणगी कक्षावरून प्रसादालय सुरू होण्यापूर्वी वितरित करण्यात येईल.*
*संस्थानने भाविकांकरिता थंड पिण्याचे पाणी,भाविकांना चहा, स्वत:चे डबे आणल्यास भोजन जागा, स्वयंपाक भांडी,सव्वा महिना करणारे भाविकांसाठी खोल्या,सुलभ दर्शनासाठी स्टिल रॅलींग,भाविकांना बसण्यासाठी खुर्ची-बाक व्यवस्था,प्रतिक्षा हाॅल, पुरुष व महिला करिता स्वतंत्र शौचालय, संस्थानमध्ये संस्थान, भक्त निवास, प्रसादालय इ. ठिकाणी २६ सीसीटीव्ही कॅमेरे आणि दान दिलेल्या गायींसाठी सुसज्ज गौरक्षण इ. सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.अगदी थोड्याच दिवसात एक दिवस मुक्कामी राहणारे भाविकांसाठी भक्त निवास विश्रांती हाॅल ठराविक भाडे घेऊन ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

*तरी सर्व भाविक- भक्तांनी तन-मन-धनाने सहकार्य करून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, अशी विनंती विश्वस्त मंडळाच्या वतीने करण्यात येत आहे.*

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे