Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

अ. भा. ग्रा. पत्रकार संघाचे एक दिवसीय राज्यस्तरीय खुले अधिवेशन,४ जानेवारी रोजी जळगाव (जामोद) येथे आयोजन

अ. भा. ग्रा. पत्रकार संघाचे एक दिवसीय राज्यस्तरीय खुले अधिवेशन,४ जानेवारी रोजी जळगाव (जामोद) येथे आयोजन

चांदूर रेल्वेत पार पडली केंद्रीय कार्यकारीणीची बैठक

MB NEWS (महाराष्ट्रातील बातमीपत्र )चांदूर रेल्वे :- अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे एक दिवसीय राज्यस्तरीय अधिवेशन ४ जानेवारी २०२४, गुरुवार ला बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव (जामोद) येथे आयोजित केले असून या संदर्भात केंद्रीय कार्यकारिणीची महत्वाची बैठक चांदूर रेल्वे येथील हॉटेल गोविंदवाडा येथे बुधवारी दुपारी पार पडली.

या बैठकीच्या अध्यक्षस्थानी अ. भा. ग्रा. पत्रकार संघाचे संस्थापक तथा केंद्रीय अध्यक्ष मनोहर सुने हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय कार्याध्यक्ष युसुफ खान, केंद्रीय उपाध्यक्ष राजेंद्र भुरे, प्रदीप जोशी, केंद्रीय महासचिव सुरेश सवळे, सचिव अशोक पवार, महा. प्रदेशाध्यक्ष कैलासबापू देशमुख, केंद्रीय कोषाध्यक्ष अशोक यावूल, केंद्रीय सदस्य अंबादास सिनकर, केंद्रीय संपर्कप्रमुख प्रा. रवींद्र मेंढे, प्रदेश सरचिटणीस बाळासाहेब सोरगिवकर, प्रदेश कार्यालय प्रमुख बाबाराव खडसे, प्रदेश सदस्य उत्तम गावंडे, महानगर अध्यक्ष राजेंद्र ठाकरे, जिल्हा कार्याध्यक्ष सचिन ढोके, जिल्हा कार्यालय प्रमुख निलेश राजस, तिवसा तालुकाध्यक्ष भूषण यावले, अमरावती तालुका सचिव रामचंद्र मुंदाने, नांदगाव खंडेश्वर तालुका सचिव उमेश चौकडे आदींची उपस्थिती होती.

या बैठकीमध्ये अ.भा.ग्रा. पत्रकार संघाचे राज्यस्तरीय अधिवेशन येत्या ४ जानेवारी २०२४ रोजी जळगाव (जामोद) येथील देवाशिष लॉन्स येथे घेण्याबाबत सर्वानुमते ठराव घेण्यात आला. यानंतर या राज्यस्तरीय अधिवेशनाच्या नियोजनासंदर्भात चर्चा करून जबाबदाऱ्या पदाधिकाऱ्यांना देण्यासाठी चर्चा झाली .यावेळी मनोहर सुने, युसुफ खान, राजेंद्र भुरे, सुरेश सवळे, कैलासबापू देशमुख, प्रा. रवींद्र मेंढे आदींनी मार्गदर्शन केले. या बैठकीला जिल्हा उपाध्यक्ष मनीष खुणे, चांदूर रेल्वे तालुकाध्यक्ष शहजाद खान, उपाध्यक्ष राहुल देशमुख, सचिव राजीव शिवणकर, सदस्य अमोल गवळी, इरफान पठाण, धिरज नेवारे, विनय गोटफोडे, प्रशांत सिसोदीया, संजय डगवार व इतरांची उपस्थिती होती. यावेळी उमेश भुजाडणे यांची अ. भा. ग्रा. पत्रकार संघाच्या अमरावती जिल्हा (पुर्व) अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल तसेच राहुल देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्य दोघांचाही शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे