क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले उत्सव समितीची स्थापना, संत गाडगेबाबा पुण्यतिथी साजरी..
MB NEWS (महाराष्ट्राची बातमीपत्र)चांदुर रेल्वे :-
3 जानेवारी रोजी होऊ घातलेल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनासाठी महालक्ष्मी नगर येथे महालक्ष्मी मंदिरामध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले उत्सव समितीची स्थापना करण्यात आली.
याच कार्यक्रमाच्या निमित्त वैराग्यमूर्ती गाडगेबाबा यांची पुण्यतिथी गाडगे बाबा चे पूजन व हरहर पण करून साजरी करण्यात आली.

3 जानेवारी 2024 होऊ घातलेल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त शहरात एक भव्य असा कार्यक्रम घेण्याचे ठरविण्यात आले त्यामध्ये उत्सव समिती स्थापन करण्यात आली.

उत्सव समितीच्या अध्यक्षस्थानी सुनील मालखेडे, उपाध्यक्ष दिनकर पवार, सचिव विशाल भोयर, कोषाध्यक्ष अमोल वानखडे, सहसचिव प्रज्वल भोयर, उत्सव समितीची कार्यकारणी गठीत करण्यात आली.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष प्रभाकर वाघ, माजी नगरसेवक बच्चू वानरे, अजय हजारे, विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष हर्षल वाघ पप्पू भालेराव,बंडू भाऊ भोयर, तिखे साहेब, चंद्रशेखर बकाले, प्रदीप कुबडे, प्रफुल्ल कोकाटे, ओमप्रकाश मानकर, विशाल भोयर, सुरेश राऊत, किशोर बकाले, मंगेश बोबडे, निलेश बनसोड, ड्रा कोठेकर, पंकज चर्जन, उपस्तित होते.

