अयोध्ये वरून आलेल्या पूजेत अक्षदांचे गुरुदेव नगरात घरोघरी वितरण
MB NEWS (महाराष्ट्रातील बातमीपत्र) सुनिल घोरमाडे (मोझरी )
:- श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथे 22 जानेवारी 2024 रोजी श्रीराम मंदिर उद्घाटन व मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे या सोहळ्याच्या तथा निमंत्रणाच्या अक्षदा अयोध्ये वरून गुरुकुंज मोझरी येथे आल्या आहे. या अक्षदा गुरुदेव नगराच्या प्रत्येक घरोघरी प्रत्यक्ष गृह संपर्क अभियान करून वाटण्यात आल्या. अक्षदा घरी वितरण करीत असताना गावकऱ्यांनी त्या आनंदाने स्वीकारून पूजन करीत सन्मानाने आपल्या देवघरात ठेवल्याचे दिसून आले. त्याचबरोबर अक्षर आपल्या दारात येतात “जय श्रीराम ” चे नारे सुद्धा लोकांनी दिले. एक धार्मिक वातावरण निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले. गृह संपर्क अभियानाचे गुरुदेव नगरचे प्रमुख योगेश काळे यांच्या प्रतिनिधित्वात अक्षद वितरण करण्यात आल्या. सोबत रोहित विरुळकर ,मयूर हट्टेल, स्वस्तिक गायकवाड, देवा सोमराळ ,मोहित काळे ,थोराज घावट, प्रथमेश देवतारे, नयन कारमोरे , रेखा कुंभलकर, अश्विनी बारबुद्धे, शितल हरणे, शोभा झोंबडे, रत्नकला येनोरकर उपस्थित होत्या.

22 जानेवारी 2024 रोजी जेव्हा अयोध्येत मूर्ति प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होईल. त्या वेळात प्रत्येकाने आपल्या जवळच्या मंदिरात सहपरिवार उपस्थित राहून पूजा पाठ व आरती करावी. त्याचबरोबर सायंकाळी प्रत्येकाने पाच दिवे लावून दिवाळी साजरी करावी असे आवाहन गृह संपर्क अभियानाचे जिल्हा संयोजक तथा विश्व हिंदू परिषदेचे जिल्हामंत्री रूपेश राऊत यांनी केले.

