निवडणुकीला होणार सुरवात,राज्यसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर..
MB NEWS (मुंबई ):-15 राज्यांत होणाऱ्या 56 जागांसाठी राज्यसभा निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. येत्या 27 फेब्रुवारीला निवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगाने याची माहिती दिली आहे.
देशातील 56 खासदारांचा कार्यकाळ एप्रिल महिन्यात संपणार आहे. यात महाराष्ट्राच्या 6 खासदारांचा समावेश आहे. त्याआधी ही निवडणूक पार पडणार आहे. दरम्यान, निवडणुकीच्या दिवशीच मतमोजणीही होणार आहे.

