Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

तलवारीच्या साह्याने मारहाण करीत दहशत निर्माण करणाऱ्या टोळक्याची पोलिसांनी काढली धिंड

तलवारीच्या साह्याने मारहाण करीत दहशत निर्माण करणाऱ्या टोळक्याची पोलिसांनी काढली धिंड

MB NEWS (धुळे) :- शिरपूर शहरातील खंडेराव मंदिर जवळ असलेल्या भाजी मार्केटमध्ये गेल्या दोन दिवसांपूर्वी एका टोळक्याने एका इसमास धारदार शास्त्रासह लोखंडी रोडने जबर मारहाण करून त्या ठिकाणाहून पोबारा केल्याची घटना उघडकीस आली होती, यासंदर्भात शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद देखील करण्यात आली होती, या अनुषंगाने शिरपूर शहर पोलीसांनी विधी संघर्षित बालकासह पाच जणांच्या मुसक्या आवळल्या असून या टोळक्याची परिसरातून पोलिसांनी धिंड काढली आहे,

शिरपूर शहर पोलिसांनी या कारवाईदरम्यान गुप्त माहिती दारा मार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे या टोळीतील काही जण हे मांडळ रोड जवळील हॉटेल च्या शेजारी असलेल्या पान टपरीच्या मागे उभे असल्याची माहिती मिळाली मिळाली होती, या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी पोलिसांना देखील त्या ठिकाणी जबर मारहाण करून पाळण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यातील दोघांना पोलिसांनी पकडले व त्यानंतर इतर फरार साथीदारांना देखील पोलिसांनी अत्यंत शिताफीने ताब्यात घेत, एकूण पाच जणांपैकी एक विधी संघर्ष बालक असून या पाचही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, या सर्व पाचही जणांची शिरपूर शहर पोलीस प्रशासनातर्फे धिंड काढण्यात आली आहे, परिसरात या टोळक्याने उच्छाद मांडल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते, आणि या अनुषंगानेच पोलीस प्रशासनातर्फे या सर्व जणांची धिंड काढण्यात आली आहे.

 

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे