घुईखेडमध्ये विदर्भस्तरीय पुरुष व महिला कुस्ती स्पर्धेचे थाटात उद्घाटन,श्री संत बेंडोजी बाबा संजीवन समाधी सोहळानिमित्त आयोजन
MB NEWS चांदूर रेल्वे :-श्री संत बेंडोजी बाबा संजीवन समाधी सोहळानिमित्त श्री संत बेंडोजी बाबा संस्थान घुईखेड, मराठा क्रीडा मंडळ घुईखेड, युवा नवरंग मंडळ व नवयुवक क्रीडा मंडळ घुईखेड तथा गावकरी यांच्या संयुक्त विद्यमाने घुईखेड येथील बेंडोजी बाबा विद्यालयात आयोजित घुईखेड केसरी भव्य विदर्भस्तरीय पुरुष व महिला कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन रविवारी थाटात झाले. ही स्पर्धा मुख्य आयोजक श्री बेडोजी बाबा संस्थेचे विश्वस्त, माजी जि.प. सदस्य प्रवीण घुईखेडकर यांच्या नेतृत्वात घेण्यात आली.
या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी तळेगाव दशासर येथील ठाणेदार रामेश्वर धोंडगे होते. तर प्रमुख उपस्थिती म्हणून गुणवंतराव गोटे, सचिन गायधने, विजय बघेल, प्रवीण घुईखेडकर, श्री बेंडोजी बाबा हायस्कूलचे प्राचार्य श्री अंबुलकर यांची उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर स्पर्धेला सुरूवात झाली. त्यामध्ये चित पटची कुस्तीची स्पर्धा सुद्धा खेळवल्या गेली. सदर स्पर्धा ही वरिष्ठ पुरुष गटात ५७ किलो, ६१ ते ६६ किलो व ७० किलो या तीन गटात खेळविल्या गेली. तर वरिष्ठ महिला गटात ५५ किलो, ६५ किलो व ६५ ते ७६ किलो या तीन गटात खेळविल्या गेली. याशिवाय कुमार पुरुष गटात ३८ किलो, ४२ किलो व ५० किलो या तीन गटात सदर स्पर्धा खेळविण्यात आली. या स्पर्धेत सदर सर्व ९ वेगवेगळ्या गटात प्रथम व द्वितीय पारितोषिक देण्यात येणार असून एकूण ६३ हजार रुपयांची पारितोषिक यामध्ये देण्यात येणार आहे.

याशिवाय गदा व मेडल सुध्दा देण्यात येणार आहे. ही स्पर्धा पाहण्यासाठी घुईखेड परिसर व आजुबाजुच्या तालुक्यातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी नंदकिशोर काकडे, विनोद काकडे, किशोर मेहर, विनय गोटेफोडे, कैलास सावनकर, मुकुंद काकडे, संगम तायडे, जनार्दन शेंडे, बाळू बंड, किशोर क्षिरसागर, कैलास सावनकर, सलमान शेख, तुषार बनकर, अजय मेश्राम, गजानन गिरी, महेंद्र हिरडे, अनिल गावंडे, रुपेश भोयर, महेंद्र गिरी, रामेश्वर बनकर, सिकंदर खान, किशोर नरगडे, रामदास पवार, बबनराव पोहनकर, शिवा विरुळकर, सुरेश चौधरी, सचिन मोकाशे, अजय पवार, लखपती मेश्राम, गजानन फिस्के, श्रीकांत खोब्रागडे, शेख इर्शाद, नितीन मेश्राम, आसिफ शेख, पवन बाविस्कर, सुरज काकडे, प्रवीण अंबुलकर, अमर कोरडे, प्रतीक काकडे, सुरज काकडे, गौरव काकडे यांसह अनेकांची उपस्थिती होती.

