जखमी माकडाला दिले वन्यजीवप्रेमीनी जीवनदानचारशे पेक्षा जास्त माकडाला दिले याआधी जीवनदा

जखमी माकडाला दिले वन्यजीवप्रेमीनी जीवनदानचारशे पेक्षा जास्त माकडाला दिले याआधी जीवनदा

MB NEWS (सुनिल घोरमाडे )तिवसा प्रतिनिधी :-तिवसा येथुन जवळच असलेल्या वरखेड फाटा नजीक एका ट्रकाच्या धडकेने एक माकड गंभीर रित्या जखमी झाल्याची घटना घडली होती यावेळी तिवसा येथील वन्यजीव पेमी अविनाश पांडे आणि त्यांच्यासोबत असलेल्या सहकाऱ्यांनी या गंभीर रित्या जखमी असलेल्या माकडाला तिवसा येथे

उपचारासाठी दाखल केले यांनी आपले कार्य आणि हिमतीचे धाडस दाखवून आपले नाव जिल्ह्यातलौकिक केले आहे तसेच आजच्याच घटनेने अपघाती परिस्थितीतही मनुष्य असो किंवा प्राणी आपले कार्य हे सजीवांच्या रक्षणासाठी आहे हे अविनाश पांडे यांनी दाखवून दिले आहे माकडाचा जीव वाचवला आहे अमरावती ते नागपूर
वरखेड फाट्या राष्ट्रीय महामार्ग जवळ एका अज्ञात वाहनाच्या धडकेने एका रस्ता ओलांडणाऱ्या माकडा ची गंभीर रित्या जखमी झाल्याची घटना घडली होती अविनाश व त्यांच्या सहकाऱ्यांनी या जखमी झालेल्या माकडाला वेळेवरच तिवसा येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात दाखल केले होते यावेळी या जखमी माकडाचा उपचार केला जखमी माकडाची माहिती वन विभागालाही देण्यात आली होती.वन विभागाला माहिती मिळतात त्यांनी तिवसा येथील पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये दाखल झाले होते यावेळी अविनाश पांडे आणि त्यांच्या सहकार्यांनी या जखमी मालकाला वनविभागाच्या स्वाधीन केले होते तसेच वन विभागाने या कार्याबद्दल त्यांचे व पथकाचे आभार मानून कौतुक केले
आहे तसेच या जखमी माकडाची
परिस्थिती योग्यरीत्या सुदृढ झाल्या वर त्याला वन परीक्षक क्षेत्रात सोडण्यात येण्याची माहिती वन विभागाकडून दिल्या गेली आहे.

गेल्या वीस वर्षांपासून वन्यजीवपेमी या क्षेत्रात काम करत असताना हजारो सापाना,शेकडो हरीण व माकडांना जीवनदान दिले आहे या पुढेही ही सेवा अशीच सुरू राहील फक्त खंत एवढी आहे की वनविभागाची वेळोवेळी मदत मिळत नाही:-अविनाश पांडे सर्पमित्र तथा वन्यजीवप्रेमी

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे