Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

बापूसाहेब देशमुख शिवाजी हायस्कूल ची विद्यार्थिनी कराटे मध्ये राष्ट्रीय स्तरावर निवड

बापूसाहेब देशमुख शिवाजी हायस्कूल ची विद्यार्थिनी कराटे मध्ये राष्ट्रीय स्तरावर निवड

MB NEWS (महाराष्ट्रातील बातमीपत्र):-चांदुर रेल्वे-श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचालित बापूसाहेब देशमुख शिवाजी हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय चांदुर रेल्वे येथील विद्यार्थी महाराष्ट्र राज्य कराटे असोसिएशन द्वारा आयोजित मुंबई येथे झालेल्या राज्यस्तरीय महाराष्ट्र राज्य कराटे अजिंक्यपद स्पर्धा 2024 मध्ये शाळेचे हिमांशू आढाऊ व उत्कर्ष भिडे हे दोन विद्यार्थी सहभागी झाले होते त्यामध्ये वर्ग 9 ब ची विद्यार्थिनी कुमारी उत्कर्षा प्रमोद भेंडे ही राज्यस्तरावर प्रथम येऊन राष्ट्रीय स्तराकरिता निवड झाली आहे उत्तराखंड मधील देहरादून या ठिकाणी होणाऱ्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेकरिता ती महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व करणार आहे त्याकरिता तिला संस्थेचे अध्यक्ष मा. हर्षवर्धनजी देशमुख व संस्थेची सर्व सन्माननीय कार्यकारणी पदाधिकारी यांनी तिला शुभेच्छा दिल्या

तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री ए. टी. मोडघरे सर, पर्यवेक्षक श्री नवरे सर क्रीडाशिक्षक श्री एस.टी.तायडे सर,कराटे प्रशिक्षक श्री संदीप देशमुख सर तसेच शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी तिला पुढील स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या व प्रथम आल्याबद्दल अभिनंदन केले. स्पर्धेकरिता तिला शाळेतील शारीरिक शिक्षक श्री एस टी तायडे व प्रशिक्षक श्री संदीप देशमुख यांचे मार्गदर्शन लाभले.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे