Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

बांधकाम कामगार प्रमाणपत्र खोळंबले,सरपंच संघटनेचे तिवसा गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन.

बांधकाम कामगार प्रमाणपत्र खोळंबले,सरपंच संघटनेचे तिवसा गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन.

MB NEWS तिवसा (सुनिल घोरमाडे):-ग्राम पंचायत स्तरावर गावातील बांधकाम कामगारांना ९० दिवस काम केले असल्याबाबत चे प्रमाणपत्र ग्राम सेवक यांचे सहिने मिळत होते मात्र गेल्या काही दिवसांपासून ग्राम सेवकांनी या प्रमाणपत्रावर सही करण्यास नकार दिला आहे त्यामुळे गावातील अनेक लोकांचे प्रस्ताव ग्राम पंचायत कडे पडून आहेत आतापर्यंत प्रमाणपत्र देण्यात आले मग आता का मिळत नाही असा सवाल लोकं विचारत आहे प्रमाणपत्र प्रत्यक्षात या बाबत शासणा कडून इतक्यात कोणताही शासन निर्णय निघाला नाही अमरावती जिल्हा परिषद किंवा तिवसा पंचायत समिती कडून कोणताही आदेश प्राप्त झाला नसून केवळ ग्रामसेवक युनियन ने निर्णय घेतला त्यानुसार प्रमाणपत्रावर सही केली जात नाही असे दिसून येते त्यामुळे तिवसा तालुका सरपंच संघटनेच्या वतीने गटविकास अधिकारी यांना निवेदन देऊन याबाबतीत नेमके काय करायचे बांधकाम कामगारांना नोंदणी साठी निर्माण झालेली अडचण कशी दूर करता येईल याबाबत आपल्या स्तरावरून तोडगा काढण्यात यावा यासाठी निवेदन दिले यावेळी सचिन भाऊ राऊत, सुरेंद्र भाऊ भिवगडे , आशिष बांबल, बादल पाळेकर , राजेश खाकसे उपस्थित होते

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे