माजी नगरसेवक तथा गटनेता वैभव गायकवाडने कॉग्रेस राम राम ठोकून भाजप पक्षात प्रवेश 

माजी नगरसेवक तथा गटनेता वैभव गायकवाडने कॉग्रेस पक्षाला राम राम ठोकून भाजप पक्षात प्रवेश 

MB NEWS विशेष प्रतिनिधी (अतुल उज्जैनकर):- नगर परिषद चांदुर रेल्वे चे माजी नगरसेवक तथा गटनेते गोटू गायकवाड यांनी काँग्रेस ला राम राम ठोकत अखेर धामणगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार प्रताप अडसड यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत अखेर भाजप मध्ये आज सायंकाळी प्रवेश घेतला.

काँग्रेसचे माजी आमदार वीरेंद्र जगताप यांचे कट्टर समर्थक म्हणून गोटू गायकवाड यांची सर्वत्र ओळख होती त्यांच्या अचानक घेतलेल्या ह्या पक्ष प्रवेशाबाबत शहरात जोरदार चर्चा सुरु असल्याचे दिसते.धामणगाव विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार मा. प्रताप दादा अडसड हे युवा नेतृत्व आहे. मतदार संघाचा सर्वांगीण विकास व्हावा हाच त्यांचा एकमेव ध्यास आहे, आपल्या तळागाळातल्या कार्यकर्त्याची विचारपूस करून त्यांच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न भाजपाचे ज्येष्ठ नेते मा. अरुण भाऊ अडसड आणि आ. प्रताप अडसड सतत करीत असतात.
अचानक घेतलेल्या ह्या भाजप प्रवेशाबद्दल विचारना केली असता असता आपल्या प्रभागाच्या विकासाचा एकमेव उद्धेश अग्रनी ठेऊन हा निर्णय घेतला असल्याचे गोटू उर्फ वैभव गायकवाड यांनी सांगितले. प्रवेशा च्या वेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष बबनराव गावंडे, पप्पू उर्फ निलेश भालेराव, प्राविण्य देशमुख, राजू चौधरी, बच्चू वानरे, बंडू भुते, अजय गावंडे, गजुभाऊ जुन्नरे असे अनेक भाजप कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे